close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IPL 2019: मेगा फायनलमध्ये रोहितने टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे.

Updated: May 12, 2019, 07:29 PM IST
IPL 2019: मेगा फायनलमध्ये रोहितने टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग

हैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे. या महत्त्वाच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी मुंबईने टीममध्ये एक बदल केला आहे. जयंत यादवच्याऐवजी फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघनला संधी देण्यात आली आहे. तर चेन्नईच्या टीमने कोणताही बदल केलेला नाही. या मॅचमध्ये टॉस जिंकलो असतो तर आपण बॉलिंगचा निर्णय घेतला असता, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली. या खेळपट्टीवर सुरुवातीला फास्ट बॉलर आणि स्पिनरना मदत होईल, पण यासाठी आम्ही तयार आहोत, असं रोहित म्हणाला.

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, मिचेल मॅकलेनघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

चेन्नईची टीम

शेन वॉटसन, फॅफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, एमएस धोनी(कर्णधार), ड्वॅन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 

रोहित-धोनीला इतिहास घडवण्याची संधी

आत्तापर्यंत सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचा रेकॉर्ड मुंबई आणि चेन्नईच्या नावावर आहे. या दोन्ही टीमनी प्रत्येकी तीन-तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएलमध्ये विजय मिळवला. तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल जिंकली आहे. यानंतर कोलकाता, हैदराबादने २ वेळा आणि राजस्थानने एकवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

आजच्या फायनलमध्ये विजय झाला तर सर्वाधिक ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा इतिहास रोहित किंवा धोनीच्या नावावर होईल.