कोलकाता : स्फोटक बॅट्समन आंद्र रसेलने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला विजयासाठी 233 रनचे तगडे आव्हान मिळाले आहे. कोलकाताने निर्धारित २० ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 232 रन केल्या आहेत. कोलकाताकडून सर्वाधिक रन या आंद्रे रसेलने केल्या. आंद्रे रसेलने ४० बॉलमध्ये ८० रनची तडाखेदार खेळी केली. तर शुभमन गिलने ४५ बॉलमध्ये ७६ रनची धमाकेदार खेळी केली. ख्रिस लिनने देखील ५४ रन काढल्या.
Innings Break!
Russell mania muscles @KKRiders to a mammoth total of 232/2 at the Eden Gardens. Onto the bowlers now to defend this.#KKRvMI pic.twitter.com/p8eIXluh6J
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2019
शुभमन गिल- ख्रिस लिन या सलामीच्या जोडीने कोलकाताला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९६ रन जोडल्या. ही सलामी जोडी मुंबईच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई करत होती. ही जोडी तोडायला राहुल चहरला यश आले. ख्रिस लेनिन ५४ रन करुन माघारी परतला. यानंतर वनडाऊन आलेल्या स्फोटक आंद्रे रसेलने मुंबईच्या बॉलर्सची धुलाईला सुरुवात केली. शुभमन गिल-आंद्रे रसेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ रन जोडल्या. कोलकाताचा स्कोअर १५८ असताना शुभमन गिल ७६ रनवर आऊट झाला.
गिल नंतर कॅप्टन दिनेश कार्तिक मैदानात आला. त्याने अखेरपर्यंत रसेलला चांगली साथ दिली. रसेलने अखेरच्या टप्प्यात केलेल्या स्फोटक खेळीने कोलकाताला २३० रनचा टप्पा पार करुन दिला. मुंबईकडून राहुल चहर आणि हार्दिक पाडंयाने प्रत्येकी १-१ विकेट मिळवला.
मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी मॅच जिंकायची आहे. तर कोलकाताला प्ले-ऑफच्या स्पर्धेत कायम राहण्यासाठी ही मॅच जिंकणे अनिर्वाय आहे. त्यामुळे मॅचच्या दुसऱ्या डावात दोन्ही टीम कशी कामगिरी करताता याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.