IPLमध्ये घुसला कोरोना! KKRनंतर चेन्नईचं टेन्शन वाढलं, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

5 ग्राऊड स्टाफ आणि 2 चेन्नईच्या फ्रांचायझीमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

Updated: May 3, 2021, 03:54 PM IST
IPLमध्ये घुसला कोरोना! KKRनंतर चेन्नईचं टेन्शन वाढलं, 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह title=

मुंबई: IPLवर कोरोनाचं संकट आहेच पण देशातील वाढत्या कोरोनासोबत आता IPLमध्ये कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा बंगळुरू विरुद्ध सामना तात्पुरता स्थगित केला आहे. हा सामना रिशेड्युल केला जाणार आहे. 

कोलकाता आणि बंगळुरू पाठोपाठ आता चेन्नई संघाचं टेन्शन वाढलं आहे. 5 ग्राऊंड स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर चेन्नईतील 2 स्टाफ मेंबरर्स देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. 

कोलकाता संघातील दोन्ही पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टर्सची नजर राहणार आहे. चेन्नईच्या फ्रांचायझीमध्ये कोरोना शिरल्यानं आता टेन्शन वाढलं आहे. 

 

ऑस्ट्रेलियाचे 3 खेळाडू कोरोना आणि बायोबबलमधून IPL सोडून माघारी आपल्या घरी परतले होते. तर आर अश्विनचं कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात आल्यानं त्याने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे.