धोनीचा नवा लूक पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या

हा पाहा माहिचा डॅशिंग लूक...

Updated: Jul 30, 2021, 02:59 PM IST
धोनीचा नवा लूक पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवत संघाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं कायमच क्रीडारसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. निवृत्तीनंतरही त्याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. असा हा खेळाडू सध्या चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या नव्या लूकमुळं. 

सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून माहिचे काही फोटो शेअर केले. 'हा पाहा माहिचा डॅशिंग लूक. त्याचा हेअरकट (haircut) आणि बिअर्ड करताना मजा आली....', असं आलिम हकिमनं लिहित माहिला नव्या रुपात आणण्याचा आनंद व्यक्त केला. 

माहिचा (MS Dhoni) हा नवा लूक पाहून क्रीडारसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्य म्हणजे हा लूक त्याला अतिशय सुरेख पद्धतीनं शोभून दिसत आहे. त्याच्या या नव्या लूकवरुन पडदा उठताच सोशल मीडियावर धोनीच्या नावाचा ट्रेंड पाहायला मिळाला होता. 

काही दिवसांपूर्वीच माहिनं त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी क्रीडावर्तुळापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत सर्वांनीच कॅप्टन कूलवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. 

रणवीरसोबत फुटबॉल खेळताना दिसला होता माही... 
काही दिवसांपूर्वीच एका व्हायरल झालेल्या फोटोत दिसल्यानुसार धोनी आणि अभिनेता रणवीर सिंह फुटबॉल खेळताना दिसले होते. धोनी क्रिकेटसोबतच फुटबॉलमध्येही चांगलाच पारंगत आहे. त्यामुळं तो फुटबॉल खेळताना दिसणं हे अनेकांसाठी नवं नव्हतं.