IPL 2022 : दिल्लीच्या पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल

राजस्थानची घसरगुंडी पॉईंट टेबलवर पाहा लखनऊ कितव्या क्रमांकावर

Updated: Apr 8, 2022, 10:29 AM IST
IPL 2022 : दिल्लीच्या पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. दरदिवशी अनपेक्षित येणारे निकाल आणि अधिक चुरशीची होणारी लढत पाहता यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार असा खरंच प्रश्न पडला आहे. मुंबई, चेन्नई आणि दिल्ली गेल्या हंगामात सर्वात स्ट्राँग टीम म्हणून पाहिल्या जात होत्या. 

यंदाच्या हंगामात मुंबई आणि चेन्नई टीमला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे राजस्थान, कोलकाता, पंजाब, लखनऊ टीम उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. राजस्थान टीम एक सामना पराभूत झाल्याने आता पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमांकावरून घसरला आहे. 

सध्या काय आहे पॉईंट टेबलची स्थिती?
कोलकाता टीमने 4 सामने खेळले असून 3 जिंकले आणि एक पराभूत झाले आहेत. कोलकाता टीम पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर लखनऊ टीम आहे. 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. 3 पैकी 2 सामने जिंकून राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. 

हैदराबाद गेल्यावर्षी प्रमाणे खालून पहिल्या स्थानावर आहे. 9 व्या क्रमांकावर मुंबई तर 8 व्या स्थानावर चेन्नई टीम आहे. यंदाच्या हंगामात चुरस लखनऊ, कोलकाता आणि राजस्थान संघात पाहायला मिळत आहे. 

सुरुवातीच्या सामन्यात ही स्थिती असली तर नंतर चित्र बदलूही शकत असा काहींचा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या सामन्यात आता काय स्थिती होते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.