IPL 2022, RR vs GT: मोस्ट विकेटटेकर,हॅट्ट्रिकही घेतली, मात्र तरीही हा स्पिनर फायनलमध्ये कुचकामी ठरणार?

IPL 2022 चा अंतिम सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे.

Updated: May 29, 2022, 04:56 PM IST
IPL 2022, RR vs GT: मोस्ट विकेटटेकर,हॅट्ट्रिकही घेतली, मात्र तरीही हा स्पिनर फायनलमध्ये कुचकामी ठरणार? title=

मुंबई : IPL 2022 चा अंतिम सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्वंच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलीय. या सामन्यात आता आयपीएलच्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

राजस्थानचा लेग-स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल आयपीएल 2022 मधला सर्वांधिक यशस्वी गोलंदाज आहे.या मोसमात सर्वांधिक 26 विकेटस घेत तो प्रथम स्थानी आहे. तो यंदाचा पर्पल कॅप होल्डर देखील आहे.     

कमजोरी ठरण्याचं कारण काय ?
युझवेंद्र चहल अंतिम सामन्यात राजस्थान संघाची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकतो. युझवेंद्र चहलला गेल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये खूप फटका बसला आहे. गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात युझवेंद्र चहलने 4 षटकात एकही विकेट न घेता 32 धावा दिल्या. यानंतर युझवेंद्र चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 4 षटकांत 45 धावा दिल्या. अशा फॉर्ममध्ये असलेल्या या गोलंदाजांवर सध्या  जबरदस्त धावा लुटल्या जातायत. 

युझवेंद्र चहलचा जर असाच खराब फॉर्म राहीला तर राजस्थान रॉयल्ससाठी तो धोकादायक ठरू शकतो. जर राजस्थान रॉयल्सला विजेतेपद पटकवायचे असेल तर युझवेंद्र चहलला विकेट घेणे गरजेचे आहे. या सामन्यात चहलची गोलंदाजी चालेल अशीच अपेक्षा राजस्थानचे खेळाडू करत आहेत. 

दरम्यान राजस्थान रॉयल्सने 2008 साली IPL ट्रॉफी जिंकली होती. आता यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा IPL  ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. आता या संधीच राजस्थान संघ सोन करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.