IPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्थिती कभी खूशी कभी गम सारखी झालेली आहे. आयपीएलच्या नव्या मोसमात रिषभ पंत DC च्या संघात म्हणून पूनरागमन करत आहे, तर दूसऱ्या बाजूला हॅरी ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. यानंतर दिल्लीच्या फॅन्ससाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे.   

Updated: Mar 15, 2024, 02:49 PM IST
IPL 2024: आयपीएलपूर्वी दिल्लीच्या टीममध्ये मोठा बदल; 'या' धाकड खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून एंट्री title=

Lungi Ngidi Injury Updates : आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघाने साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लूंगी एनगिडीला 50 लाख रूपयात आपल्या ताफ्यात सामील केले होते. पण आता आयपीएल सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच दिल्लीचे टेन्शन वाढलेलं आहे. कारण, लूंगी एनगिडीने IPL 2024 मधून आपले नाव मागे घेतलेले आहे. एनगिडीला झालेल्या दुखापतीमूळे त्याने या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण यामूळे दिल्ली कॅपिटल्सच्या चिंता वाढलेल्या आहेत.

 

लुंगी एनगिडी दूखापतीमूळे आयपीएल 2024 ला मूकणार

 

लुंगी एनगिडीने आयपीएलमध्ये ऊत्कृष्ट प्रदर्शन करत 14 मॅचेस मध्ये 25 विकेट्स घेतलेल्या आहेत. मागच्या सिजनपर्यंत एनगिडी हा एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सूपर किंग्सकडून खेळत होता. सीएसके कडून खेळताना लूंगी एनगिडीने अनेक मॅचेस जिंकवून दिल्या होत्या. पण यावर्षी लुंगी एनगिडीला आयपीएल खेळण्यापासून ग्रहण लागलेले आहे. 

एनगिडीने असे स्पष्ट केले आहे की, प्रॅक्टिस करताना त्याला दुखापत झाली असून तो आयपीएल 2024 ला मूकणार आहे. यावर एनगिडीने जास्त माहिती दिलेली नाहीये. दिल्ली कॅपिटल्सने ही बातमी कळताच लगेचच लुंगी एनगिडीची रिप्लेसमेंट पण शोधलेली आहे, आणि जॅक फ्रेजर-मॅकगर्क या ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरला आपल्या टीममध्ये सामील केलेलं आहे. 

जॅक फ्रेजर-मॅकगर्कची होणार दिल्ली कॅपिटल्समध्ये एंट्री

 

लुंगी एनगिडीच्या एक्झिटमूळे दिल्लीच्या बॉलिंगमध्ये थोडा फरक तर पडणार आहे. पण हे  बघणयायोग्य असणार असेल की, जॅक फ्रेजर-मॅकगर्क हा दिल्लीच्या संघासाठी आयपीएल 2024 मध्ये कशा पद्धतीची कामगिरी करणार? BBL मध्ये चमकदार कामगिरी करत आयपीएलमध्ये आपले स्थान मिळवणाऱ्या जॅक फ्रेजर-मॅकगर्क हा IPL 2024 मध्ये आपले दमदार प्रदर्शन दाखवण्यासाठी उत्सुक असणार आहे. जॅकने मागच्या वर्षी झालेल्या 'मार्श कपमध्ये' 29 बॉलमध्ये लिस्ट-ए-क्रिकेटमध्ये इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधले होते. पण आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये कोणत्याही टीमने जॅकवर बोली लावलेली नव्हती.  

टी 20 क्रिकेटमध्ये जॅक फ्रेजर-मॅकगर्कने 37 मॅचेसमध्ये एकूण 645 रन्स बनवलेले आहेत.  तर दुसऱ्याबाजूला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अजूनपर्यंत हॅरी ब्रूकची रिप्लेसमेंट शोधलेली नाहीये. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, कोणता प्लेअर हॅरी ब्रूकची रिप्लेसमेंट म्हणून दिल्लीमध्ये सामील होणार? आणि ऋषभ पंतच्या येण्यामूळे दिल्लीच्या टीममध्ये किती फरक पडणार?

दिल्ली कॅपिटल्सचा स्कॉड - 
ऋषभ पंत, स्वास्तिक चिकारा, शाई होप, सुमित कुमार, झाय रिचर्डसन, रसिख सलाम, कुमार कुशाग्र, रिकी भुई, ट्र्स्टन स्टब्स, हैरी ब्रूक, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद, लुंगी नगिदी, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल, यश धुल, पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, , मिचेल मार्श, ललित यादव और अक्षर पटेल.