IPL 2024 Brian Lara On MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान आज वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रिमिअर लिगमधील 25 वा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहेत. मुंबईचा संघ त्यांच्या 4 पैकी 1 सामन्यांमध्ये विजय मिळवून आठव्या क्रमांकावर आहे तर आरसीबीचा संघ पाच सामन्यांपैकी 1 सामना जिंकून नवव्या स्थानी आहे. याच सामन्याबद्दल वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने आपलं मत व्यक्त केलं आहे. सातत्याने पराभव झाल्यानंतर नेहमीप्रमाणे यंदाच्या पर्वातही मुंबईने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत बंगळुरुच्या सामन्याआधी आत्मविश्वास मिळवला आहे, असं लारा म्हणाला आहे. मात्र त्याचवेळी आरसीबीमधील समस्येसंदर्भात लाराने भाष्य केलं आहे. आरसीबीच्या संघामध्ये रचनात्मक अडचणी आहेत. त्यांना त्यांच्या फलंदाजीचा क्रम निश्चित करावा लागेल असं लाराने म्हटलं आहे. मुंबई विरुद्ध जिंकायचं असेल तर हाच आरसीबीसाठी विजयाचा गुरुमंत्र ठरु शकतो.
"मुंबईच्या संघाला नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे थोडाफार फॉर्म गवसला आहे. रोमारिओ शेफर्डसारख्या वेस्ट इंडियन खेळाडूला उत्तम कामगिरी करताना पाहून आनंद वाटला. मला वाटतं त्याचा टायमिंग अगदी उत्तम आहे. आरसीबीमध्ये रचनात्मक अडचणी फार आहेत. त्याचा फॉर्म ओके आहे. मात्र मला असं वाटत नाही ती त्यांचा योग्य संघ सामन्यांमध्ये मैदानात उतरलेला असतो. माझ्यामते त्यांच्या फलंदाजीचा क्रम योग्य नाही. मुंबई इंडियन्सच्या संघाला त्यांच्या फलंदाजीचा क्रम निश्चितपणे ठाऊक आहे. सुर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये नाही. त्याने फारश्या धावा केलेल्या नाहीत. मला वाटतं सध्याची स्थिती पाहता या दोन्ही संघांना आपलं मैदानावरील शत्रुत्व या सामन्याच्या निमित्ताने एक टप्पा पुढे नेतील. पण यामध्येही मुंबईचा संघ उजवा वाटतोय," असं ब्रायन लाराने 'स्टार स्पोर्ट्स प्रेस रुम'मध्ये संवाद साधताना म्हटलं.
आरसीबीच्या संघाने स्थानिक खेळाडूंमधील कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरसीबीने केवळ त्यांच्या परदेशी खेळाडूंपैकी स्टारस्टड खेळाडूंवर अवलंबून रहू नये. कारण या पर्वामध्ये आतापर्यंत त्यांना लय गवसलेली नाही, असं लारा म्हणाला. "मुंबईला अधिक संधी आहे कारण त्यांनी अनेक समस्यांवर तोडगा शोधला आहे. सुर्यकुमार यादव पुन्हा मैदानात आला आहे. त्याला त्या दिवशी चमकदार कामगिरी करता आळी नाही. मात्र तो केवळ परतलाय हेच संघाला अधिक बळकट बनवणारं आहे. दुसरीकडे आरसबीला अजूनही त्याचा उत्तम फॉर्म आणि उत्तम संघ कोणता हे सापडलेलं नाही. तसेच महिपाल लोमारेरसारख्या खेळाडूने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊनही त्याला अपेक्षित असणारं सारं काही केल्यानंतरही त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आलं आहे. मला वाटतं त्यांनी परदेशी पंचतारांकित खेळाडू वगळून इतर उपलब्ध स्थानिक खेळाडूंना संधी देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंवर अधिक भर दिला जात आहे. हे खेळाडू आरसीबीसाठी कसे खेळतील आणि जास्त सामने कसे जिंकवूवन देतील याबद्दल चर्चा होताना दिसते. अर्थात तुमच्याकडे विराट कोहली आहे. मात्र त्यांच्याकडे खरोखरच उत्तम स्थानिक खेळाडू आहेत. तुम्ही स्थानिक खेळाडूंच्या उत्तम कामगिरीशिवाय चषक जिंकू शकत नाही. सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी अशा खेळाडूंकडून उत्तम कामगिरी व्हावी याची मी वाट पाहत आह," असं लारा म्हणाला.
नक्की वाचा >> आज MI vs RCB! मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारे आकडे; पाहा Playing XI, हेड टू हेड रेकॉर्ड
यावेळेस लारासोबत पॅनलिस्ट म्हणून सहभागी झालेल्या अंबती रायडूने आरसीबीच्या संघाविरुद्ध खेळत होता त्यावेळेच्या आठवणींना उजाळा दिला. "तुम्ही आरसीबीविरुद्ध खेळता तेव्हा ते फार उत्साही असतात. तुम्ही त्यांच्याविरुद्ध तुमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करता. बरं तुम्ही तुमचं सर्वोत्तम क्रिकेट खेळलात तरी आरसीबीसारखा संघ तुम्हाला पराभूत करु शकतो. मात्र आता अशी परिस्थिती दिसत नाही," अशी खंत रायडूने व्यक्त केली. आरसीबीने आपल्या फलंदाजीमध्ये समतोल आणण्याची गरज रायडूने व्यक्त केली आहे.
नक्की पाहा >> 'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral
"खोलपर्यंत फलंदाजी असावी असा प्रयत्न आरसीबीच्या संघाने केला पाहिजे. त्यांच्या संघातील सर्वोत्तम नावं त्यांनी निवडली पाहिजे. तुमचे सगळे सर्वोत्तम खेळाडू सुरुवातीला खेळतात आणि शेवटी तुम्ही तणावाच्या काळात तरुण खेळाडूंना एकटं सोडून देता असं करणं योग्य नाही. तुम्हाला हे वाटून घेतलं पाहिजे. मॅक्सवेलने 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला यायाला हवं. त्याने दिनेश कार्तिकबरोबर सामना संपवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. याचा संघाला फायला होईल," असं रायडू म्हणाला.