IPL 2024 : शिखर धवन पुन्हा एकदा अडणार विवाहबंधनात? मिताली राजशी अफेयरच्या चर्चेबद्दल खेळाडूचा खुलासा

Shikhar Dhawan Mithali Raj Marriage Rumour : आयपीएल 2024 मध्ये धवन काही कमाल दाखवू शकला नाही, मात्र तरी तो एका खास कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तो पुन्हा एकदा लग्न करणार असून मिताली राजसोबत अफेयरची चर्चा रंगलीय. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2024, 01:39 PM IST
IPL 2024 : शिखर धवन पुन्हा एकदा अडणार विवाहबंधनात? मिताली राजशी अफेयरच्या चर्चेबद्दल खेळाडूचा खुलासा  title=
IPL 2024 Shikhar Dhawan will get marriage once again player revelation about the talk of affair with Mithali Raj

Shikhar Dhawan Mithali Raj Marriage Rumour : पंजाब किंग्जचा कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन यंदाचा आयपीएल 2024 मध्ये फार कमाल दाखवू शकला नाही. तो या सिझनमध्ये केवळ पाच सामने खेळला ज्यात त्याने  125.62 च्या स्ट्राईक रेटने 152 धावा केल्या आहेत. यात एक हाफ सेंच्युरीदेखील आहे. पण दुखापतीमुळे तो आयपीएल 2024 मधील इतर सामने खेळू शकला नाही. या दुखापतीशिवाय तो एका कारणामुळे खूप चर्चेत होता. ते म्हणजे माजी भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजसोबतच्या नात्यामुळे. एका मुलाखती शिखर धवनने खुद्द या नात्याबद्दल खुलासा केलाय. 

धवन मितालीशी लग्न करणार का?

शेखर धवन याचा घटस्फोट झाला आहे आणि आता तो दुसरं लग्न करणार आहे अशी चर्चा रंगली होती. धवनने स्वत: सांगितलं की, एकेकाळी अशी अफवा पसरली होती की, तो माजी कर्णधार मिताली राजसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या जवळीकीच्या बातम्या मीडियामधून पुढे आल्या होत्या. मी मिताली राजसोबत लग्न करणार हे माझ्याही कानावर आलं. त्यावर तो हसलाही. शिखर धवनने 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. मात्र, आता त्या दोघांनी घटस्फोट घेतला. 

हेसुद्धा वाचा - Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral

धवन-आयेशाचे लग्न कसं झालं होतं?

शिखर धवन आणि आयशा यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती आणि या दोघांची ओळख हरभजन सिंग यांनी घडवून आणली. आयेशा मुखर्जीचा जन्म भारतात झाला असला तरी ती नंतर ऑस्ट्रेलियात लहानची मोठी झाली. आयशा किकबॉक्सर असून त्याचे वडील बंगाली आणि आई ब्रिटिश आहे. आयशा शिखर धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती, पण म्हणतात ना प्रेमाला वयाची मर्यादा नसते. त्या दोघांनी 2009 मध्ये साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. आयशाचं हे दुसरं लग्न होतं आणि पहिल्या लग्नापासून तिला दोन मुली आहे.