IPL 2024: रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? हार्दिक पुन्हा 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार पण...

IPL 2024 Trade Window: रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एका दशकाहून अधिक काळापासून रोहित शर्मा मुंबईच्या संघासाठी खेळतोय. हार्दिक पंड्या मागील 2 वर्षांपासून गुजरातचं नेतृत्व करतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2023, 12:13 PM IST
IPL 2024: रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? हार्दिक पुन्हा 'मुंबई इंडियन्स'मध्ये येणार पण... title=
हार्दिक 2 वर्षांपूर्वी संघाबाहेर पडला

IPL 2024 Trade Window: इंडियन प्रमिअर लीग 2023 ला अजून 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र ही स्पर्धा खेळाडू स्वॅपिंग म्हणजेच खेळाडूंच्या आदलाबदलीमुळे आतापासूनच चर्चेत आहे. आयपीएलच्या 17 व्या पर्वाची ट्रान्सफर विंडो 26 नोव्हेंबर रोजी बंद होत आहे. मात्र काही वेबसाईट्सने दिलेल्या बातम्यांनुसार या ट्रान्सफरमध्ये मोठा फेरफार दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरात टायटन्सला पहिल्याच पर्वात जेतेपद आणि दुसऱ्या पर्वात उपवेजेता पद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याची घर वापसी होण्याची शक्यात आहे. तर अंतरराष्ट्रीय टी-20 संघात यापुढे निवड होण्याची शक्यता कमी असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या जर्सीऐवजी एका नव्या जर्सीत दिसू शकतो.

रोहितने जिंकवले 5 कप

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एका दशकाहून अधिक काळापासून रोहित शर्मा मुंबईच्या संघासाठी खेळतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. याच नेतृत्व गुणांच्या आधारे रोहितकडे वर्ल्ड कपआधी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदरी सोपवण्यात आली. मुंबई इंडियन्सचा संघ रोहितला इतक्या सहज रिलीज करणार नाही. दुसरीकडे हार्दिक पंड्याने आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर 2022 मध्ये पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सच्या संघाला जेतेदपद मिळवून दिलेलं. तर 2023 मध्ये गुजरातचा संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून पराभूत झाला होता. 

पंड्या गुजरातमध्ये

हार्दिक पंड्याचंही मुंबई इंडियन्सबरोबर खास कनेक्शन आहे. हार्दिकला अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी मुंबई इंडियन्सचा मोलाचा वाटा आहे. याच संघाने हार्दिकला पहिल्यांदा 10 लाखांच्या बेस प्राइजवर संघात स्थान दिलेलं. दरवर्षी उत्तम कामगिरी करणाऱ्या हार्दिकसाठी 2016 साली भारतीय संघाची दारं उघडली. हार्दिक पंड्या गुजरातचा संघ आयपीएलमध्ये सहभागी झाल्यानंतर मुंबई सोडून गुजरातच्या संघामध्ये गेला. मागील 2 वर्षांपासून तो गुजरातच्या संघाचं नेतृत्व करत आहे. 

नक्की वाचा >> सूर्यकुमार कधीच विसरणार नाही 22 नोव्हेंबर ही तारीख! Captain म्हणून पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये..

पंड्याची घर वापसी

गुजरात टायन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आपल्या जुन्या टीममध्ये म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा येण्याची दाट शक्यता असल्याचं वृत्त 'न्यूज 18'ने दिलं आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या गुजरात सोडून आल्यानंतर गुजरातच्या संघाचं नेतृत्व थेट रोहित शर्माच्या हाती जाईल असंही सांगितलं जात आहे. म्हणजेच दोन्ही संघ एकमेकांबरोबर कॅर्णधारांची अदला-बदली करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नक्की वाचा >> 'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला

असं झालं तर...

खरोखरच असं झालं तर हार्दिक पंड्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होईल. हार्दिक पंड्या मुंबईच्या संघात येणार असेल तर कर्णधारपद तो सोडणार नाही. हार्दिकने कर्णधारपदाची मागणी केली तर 2024 मध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी खेळून 2025 साली संघाचं नेतृत्व करण्याची ऑफर त्याला दिली जाऊ शकते.