Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 24, 2024, 04:14 PM IST
Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल title=
Jay Shah Statement On Team India Head Coach

Team India Head Coach : टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) संपणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय नव्या हेड कोचच्या शोधात आहे. बीसीसीआयकडून (BCCI) नव्या प्रमुख प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गजांनी म्हणजेच रिकी पॉन्टिंग, जस्टीन लँगर आणि अँडी फ्लॉवर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नकार दिला. माध्यमांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी वेगवेगळी कारणं देऊन हेड कोचसाठी (Team India Head Coach) नकार दिला होता. मात्र, आता जय शहा (Jay Shah) यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची पोलखोल केलीये.

काय म्हणाले जय शहा?

मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूशी संपर्क साधलाच नाहीये. काही माध्यम चॅनेलमध्ये सुरू असलेलं वृत्त पूर्णपणे खोटं आहे, असं म्हणत जय शहा यांनी लँगर आणि पाँटिंगला तोंडावर पाडलंय. हेड कोचची निवड करणं आमच्यासाठी एक काळजीपूर्वक प्रक्रिया आहे. ज्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट रचनेची माहिती आहे. ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये प्रगती केली आहे, अशातच व्यक्तींना निवडण्याचा आमचा कल असतो, असंही बीसीसीआय सचिवांनी म्हटलं आहे.

मला राष्ट्रीय संघाचा वरिष्ठ प्रशिक्षक व्हायला आवडेल, परंतु माझ्या आयुष्यात इतर गोष्टी आहेत आणि मला घरी थोडा वेळ घालवायचा आहे, असं रिकी पाँटिंगने म्हटलं आहे. तर भारतीय संघाचा हेड कोचवर बोलताना केएल राहुलने मला आधीच सतर्क केलं होतं. आयपीएलमध्ये तुमच्यावर प्रेशर आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पेक्षा जास्त दबाव टीम इंडियाचे कोच म्हणून असेल असं राहुलने मला सांगितलं, असं वक्तव्य लँगर यांनी केला होता. त्यावरून आता तुम्हाला विचारलंय कोणी? असा सवाल करत त्यांना तोंडावर पाडलंय.

तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळा कोच?

वनडे क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि टेस्टसाठी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. तिन्ही  फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांना देखील अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अंतिम तारीख 27 मे असेल, असं जय शहा यांनी म्हटलं होतं.