मुंबई : लखनऊ विरुद्ध सामन्यात हैदराबादचा 12 धावांनी पराभव झाला. लखनऊचा सलग दुसरा विजय आहे. लखनऊ टीममधील एका खेळाडूचा फ्लॉपशो कायम सुरू आहे. त्याचा फटका टीमला बसत आहे.
हैदराबादचा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात लखनऊच्या मनीष पांडेचा फ्लॉप शो परत पाहायला मिळाला. एक नाही तर 3 सामन्यात त्याची खराब कामगिरी राहिली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं जाऊ शकतं.
मनीष पांडेला लखनऊने 4 कोटी 60 लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतलं. त्याने पहिल्या सामन्यात 6 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 11 तर तिसऱ्या सामन्यात 9 धावा केल्या. त्याने 3 सामन्यात मिळून 22 धावा केल्या आहेत.
32 वर्षांच्या मनीष पांडेजवळ आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याने 156 सामन्यात 3571 धावा केल्या आहेत. मात्र सध्या त्याचा वाईट फॉर्म सुरू असल्याने के एल राहुलही वैतागला आहे. त्याला पुढच्या सामन्यात संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुलकडून सामन्यानंतर मोठी अपडेट
पावर प्लेमध्ये विकेट्स घालवणं अजिबात आवडलं नाही. तसं जर वारंवार होत राहिलं तर त्याचा फॉर्मवर फरक पडतो. अजून बरं शिकण्याची गरज आहे. फलंदाजीवर अजून लक्ष द्यायला हवं आहे. गोलंदाजीमध्ये आम्ही तिन्ही सामन्यात वरचढ ठरलो. मात्र फलंदाजीमध्ये मार खाल्ला.