अजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 9, 2018, 10:10 AM IST
अजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण title=

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.

गोलंदाज चमकले मात्र फलंदाजांनी केली निराशा

दोन्ही डावांमध्ये भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. यारुव वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाज टिकू शकत नसल्याचे पुन्हा समोर आले. याबाबत कोहली म्हणाला, वेगवान खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी २० विकेट घेत चांगली कामगिरी केली मात्र भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पुढच्या सामन्यात जर भारतीय फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर इतक्या विकेट घेऊन काहीच फायदा होणार नाही. 

या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे २०९ आणि १३५ धावा केल्या. पहिल्या कसोटीत भारताला ७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला, कोणत्याही कसोटीत विजय मिळवण्यासाठी २० विकेट घेणे ही प्राथमिकता आहे. मात्र एकीकडे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि फलंदाजांनी साफ निराशा केली तर याचा काहीच अर्थ राहत नाही. प्रतिस्पर्धी संघाने विजयासाठी ठेवलेल्या आव्हानाजवळ जर तुम्ही पोहोचू शकत नसाल तर त्या २० विकेटचा काही अर्थच उरत नाही. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तीच लय फलंदाजीतही कायम राहायला हवी होती. 

अजिंक्यला का खेळवल?

हे बोलताना कोहलीच्या आवाजात साफ निराशा दिसत होती. परदेशी खेळपट्ट्यांवर यशस्वी राहणाऱ्या अजिंक्यला या सामन्यात संधी दिली न गेल्याने फलंदाजांवर निशाणा साधण्यात आला. अजिंक्यच्या जागी रोहितला संधी देण्यात आली. यावेळी कोहलीने रोहितच्या निवडीबाबत बचावात्मक भूमिका घेतली. रहाणेच्या जागी शर्माची निवड ही त्याच्या कामगिरीवरुन झाली असल्याचे कोहलीने यावेळी सांगितले.