कर्णधार कोहलीने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय

कुलदीप यादवची हॅट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५० धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कोहलीने गोलंदाजांना याचे श्रेय दिले आहे. 

Updated: Sep 22, 2017, 10:00 AM IST
कर्णधार कोहलीने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय title=

कोलकाता : कुलदीप यादवची हॅट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५० धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कोहलीने गोलंदाजांना याचे श्रेय दिले आहे. 

कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, स्पिनर्स कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे कौतुक केले. 

कोहली म्हणाला, पहिल्या डावात आम्ही पुरेशी धावसंख्या उभारु शकलो नाही. मात्र आम्हाला माहीत होते की चांगली सुरुवात केल्यास विजयाची संधी आहे. ठराविक अंतराने विकेट घेणे गरजेचे होते. विकेट मिळवणे सोपे नव्हते. 

भुवीने सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने सहा ओव्हरमध्ये नऊ रन्स देताना तीन विकेट घेतल्या. येथेच विजयाचा पाया रचला गेला. त्यानंतर स्पिनर्सनीही ठराविक अंतराने विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम राखला.