मुंबईचं कोलकात्यापुढे १८२ रनचं आव्हान

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत.

Updated: May 6, 2018, 05:58 PM IST
मुंबईचं कोलकात्यापुढे १८२ रनचं आव्हान title=

मुंबई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे मुंबईला एवढ्या रनपर्यंत मजल मारता आली. यादवनं ३९ बॉलमध्ये ५९ रनची खेळी केली. यामध्ये ७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. यादवबरोबर ओपनिंगला आलेल्या एव्हिन लुईसनं २८ बॉलमध्ये ४३ रन केले. लुईसनं ५ फोर आणि २ सिक्स लगावल्या. यादव आणि लुईसमध्ये ९१ रनची पार्टनरशीप झाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा ११ रनवर आऊट झाला. मुंबईनं या मोसमात जिंकलेल्या तिन्ही मॅचमध्ये रोहितचा स्कोअर २० रनपेक्षा जास्त होता. हार्दिक पांड्यानं २० बॉलमध्ये नाबाद ३५ रन केले. कोलकात्याकडून सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलनं प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

९ पैकी ६ मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे तर ३ मॅच जिंकण्यात रोहितच्या टीमला यश आलं आहे. ६ पॉईंट्सह मुंबई ५व्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धची मागची मॅच मुंबईनं जिंकली होती. अशीच कामगिरी या मॅचमध्ये करण्याचं आव्हान मुंबईच्या टीमपुढे असणार आहे. प्ले ऑफला क्वालिफाय होण्यासाठी मुंबईला ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे कोलकात्यानं ९पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. १० पॉईंट्सह कोलकात्याची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता किंवा मुंबई कोणतीही टीम ही मॅच जिंकली तरी पॉईंट्स टेबलमध्ये कोणताही फरक पडणार नाही.