Hardik Pandya : ....म्हणून कृणाल पांड्या हार्दिक पांड्याला मिठी मारुन ढसाढसा रडला

हार्दिक पांड्याचा थोरला Hardik Pandya भाऊ क्रुणालने भारतीय संघाकडून याआधी टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २०२० च्या आयपीएलमध्ये

Updated: Mar 23, 2021, 11:01 PM IST
Hardik Pandya : ....म्हणून कृणाल पांड्या हार्दिक पांड्याला मिठी मारुन ढसाढसा रडला title=

मुंबई  : हार्दिक पांड्याचा थोरला  भाऊ क्रुणालने भारतीय संघाकडून याआधी टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २०२० च्या आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीनंतर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत शानदार कामगिरी केली. त्याने विजय हजारे स्पर्धेतील ५ डावात ३८८ धावा केल्या. यात दोन शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश होता. भारताकडून krunal Pandya क्रुणालने आतापर्यंत १८ टी-२० सामन्यात २६च्या सरासरीने १२१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईकडून Hardik Pandya हार्दिक आणि क्रुणाल एकात्र खेळतात. पण आता कृणाल पांड्या भारतीय वनडे संघात देखील दिसणार आहे.

मंगळवारपासून 3 एक दिवसीय भारत विरुध्द इंग्लड या सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने पहिल्या वन डे त कृणाल पांड्याला भारतीय वनडे संघात पदार्पणाची संधी दिली. धाकटा भाऊ हार्दिकने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका क्रुणालला दिली. पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर कृणालने ती आकाशाच्या दिशेनं वर फेकत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

आपल्या भावाकडून कॅप मिळाल्यानंतर वडिलांच्या आठवणीत कृष्णाल भावनिक झाला.  कृणाल आणि हार्दिक पांड्याचे वडील हिमांशू पंड्या यांचे यावर्षी जानेवारीत निधन झाले. हार्दिक आणि क्रुणाल दोघेही त्यांच्या वडिलांचे अगदी जवळचे होते.  

क्रुणाल सोबत प्रसिद्ध कृष्णाने देखील भारताकडून वनडेत पदार्पण केले. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. त्याने देशांतर्गत स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहेय २०१७-१८च्या विजय हजारे स्पर्धेत १७ विकेट घेतल्या होत्या. त्याने २०१९-२० मध्ये देखील त्याने १७ विकेट घेतल्या.