पाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...

  पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली. 

Updated: Mar 19, 2018, 02:33 PM IST
पाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर... title=

नवी दिल्ली :  पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली. 

मॉडलने दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत केल्यानंतर तिला मोहम्मद शमीचा मेसेज आला होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला पाकिस्तानने १८० धावांनी पराभूत केले होते. पराभवानंतर टीम इंडिया ड्रेसिंग रूमकडे जात असताना एका पाकिस्तानी फॅनने शमीकडे पाहून म्हटले होते की, बाप कोण आहे. 

२८ वर्षीय गोलंदाज भडकून त्या पाकिस्तानी फॅनशी भिडला होता. एमएस धोनीने शमीला सांभाळले आणि डेसिंग रूमकडे घेऊ गेला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शमीबाबत चर्चा झाली. 

अलिश्बा या जलद गती गोलंदाजाबाबात जाणून घेण्यात उत्सूक होती. त्याचवेळी अलिश्बाने शमीच्या पेजवर एक मेसेज टाकण्याचा निर्णय घेतला. शमीने अलिश्बाच्या मेसेजचे उत्तर दिले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. 

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अलिश्बा म्हणाली, मी त्याची फॉलोअर्सपैकी एक आहे. या प्रकारे आमच्यात मैत्री झाली. त्याचे लाखो चाहते आहेत, त्या पैकी मी एक आहे. मी त्याला अनेक मेसेज केले आहेत.  व्यक्ती म्हणून शमी मला खूप आवडतो. कोणत्याही फॅन प्रमाणे मी त्याला भेटण्याची इच्छा ठेवते.