Team India News: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (India Vs West Indies) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला. या सामन्यात चमकला तो यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). या सामन्यात 171 डावांची धमाकेदार खेळी केली. त्यावर आता टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी तोंडभरून कौतुक केलंय.
जयस्वालच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील अफलातून 171 धावांची खेळी पारी पाहून मी थक्क झालो. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं आशादायी भविष्य आहे. मी याआधीही सिलेक्टर रोहिलोय, त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखाद्या खेळाडूची निवड कराल तेव्हा तो पुढील 10 वर्षे भारताकडून खेळेल, या उद्देशाने त्याची निवड करावी. मी त्याला आयपीएलमध्ये धावा करताना पाहिले आहे, तो किती डायनॅमिक खेळाडू आहे, याची प्रचिती मिळते. तो कोणत्या प्रकारचा स्ट्रोक प्लेअर आहे हे तुम्ही पाहिलंच असेल. कोणत्याही परिस्थितीनुसार तो खेळात बदल करू शकतो, असं टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी त्याने 90 चेंडूत सुमारे 20 धावा केल्या. माझ्या मते हेच माझ्यासाठी डावाचे वैशिष्ट्य होते. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघासोबत त्याच्याकडे प्रचंड क्षमता आणि उज्ज्वल भविष्य आहे यात शंका नाही, असं म्हणत राठोड यांनी जयस्वालचं कौतुक केलंय.
शुभमन गिलकडे (Shubman Gill) भरपूर क्षमता आहे आणि इतर फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता गाठली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही धावा केल्या आहेत. कधीकधी विशिष्ट फॉरमॅटला थोडा वेळ लागू शकतो. त्याच्याकडे असलेली क्षमता, फलंदाजीमध्ये तो भारतीय संघाचे भविष्य आहे यात मला शंका नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो दीर्घकाळ भारतीय संघाकडून खेळणार आहे, असा विश्वास राठोड यांनी दाखवला.
भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.