New Zealand vs Sri Lanka : वनडे विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेतील 41 वा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने (NZ vs SL) न्यूझीलंडसमोर 172 धावांचं किरकोळ आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने अपेक्षेप्रमाणे चांगली फलंदाजी करत लंकादहन केलंय. मात्र, श्रीलंकेच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानला (Pakistan Cricket) आता टाटा गुड बाय करण्याची वेळ आली आहे. कारण, न्यूझीलंडने स्वत:च्या हिंमतीवर सेमीफायनलमध्ये जवळजवळ एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानला आता फक्त एखादा मोठा चमत्कारच सेमीफायनलमध्ये (Semi Finals scenario) पोहोचवू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचे 10 अंक झाले आहेत. न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर न्यूझीलंडचा सध्या +0.743 नेट रननेट आहे. त्यामुळे न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करेल, असं निश्चित मानलं जातंय. पाकिस्तान देखील सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. त्यासाठी पाकिस्तानला मोठ्या विजयाची गरज आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या नाड्या इंग्रजांच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तुमच्या लक्षात असेल तर पाकिस्तानसोबतच अफगाणिस्तान देखील सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. मात्र, त्यांचा रनरेट कमी असल्याने अफगाणिस्तानची चर्चा होत नाहीये. अफगाणिस्तानला आगामी सामना जिंकून उपयोग नाही तर त्यांना तब्बल 300+ धावा विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
New Zealand made a solid push to affirm their place in the top four with a crucial victory over Sri Lanka #NZvSL | #CWC23 | : https://t.co/y10v87Cf06 pic.twitter.com/dHoMhVUduO
— ICC (@ICC) November 9, 2023
कसा झाला सामना?
श्रीलंका संघासाठी सलामीवीर कुसल परेरा याने आक्रमक 51 धावांची खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. तळातील फलंदाजांनी थोडाफार संघर्ष करत श्रीलंकेला दीडशे पार पोहोचवले. महिश थिक्षणा व मदुशंका यांनी अखेरच्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. मात्र, अखेरीस त्यांचा डाव 171 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघासाठी ट्रेट बोल्ट याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
तर श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांचं आव्हान पार करताना न्यूझीलंडची देखील पडझड झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांन चांगली सुरूवात करून दिली खरी.. मात्र, दोघांनाही अर्धशतक झळकावता आलं नाही. मिशेलने 43 धावांची खेळई केली. मात्र, कॅप्टन केन 14 धावांवर गारद झाला. त्यानंतर उरलेल्या फलंदाजांनी खेळ संपवला आणि न्यूझीलंडने 5 गडी राखून सामना जिंकल आहे.