मोहम्मद रिझवानची 'ती' कृती, संपुर्ण पाकिस्तान खळवळला, पाहा VIDEO

ज्या देशाच प्रतिनिधित्व करतो, त्या देशाच्या झेंड्याची लाज देखील राखली नाही, मोहम्मद रिझवानने पाकिस्तानी झेंड्यासोबत असं काय केल? VIDEO पाहुन तुम्हीच समजून घ्या संपुर्ण घटना 

Updated: Sep 27, 2022, 01:20 PM IST
मोहम्मद रिझवानची 'ती' कृती, संपुर्ण पाकिस्तान खळवळला, पाहा VIDEO   title=

लाहोर : टीम इंडियाचा (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan)  संघाबाबत कोणतीही गोष्ट असो त्याची चर्चा भारतात होतच असते. कारण दोन्ही संघांना त्यांच्या त्यांच्या देशात काय चाललंय? कोणता संघ सर्वश्रेष्ठ आहे? यामध्ये नेहमीच स्पर्धा सुरू असते. त्यात आता एक अशी घटना घडलीय,जी घटना पाहून पाकिस्तानसह भारतीय चाहते देखील या घटनेचा निषेध करतातयत. नेमकं या घटनेत काय झालंय ते जाणून घेऊयात. 

पाकिस्तान (Pakistan)  संघ संध्या इंग्लंडविरूद्ध  (PAK Vs ENG) टी20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेदरम्यानचं एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोहम्मद रिजवानचा आहे. या व्हि़डिओतील मोहम्मद रिजवानची ती कृती पाहून पाकिस्तानी चाहत्यांचे रक्त खळवले आहे.  

व्हिडिओत काय? 
व्हिडिओत पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर असलेला रिजवान (Mohammad Rizwan) त्याच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. रिजवान फॅन्सच्या जर्सीवर व टोपीवर ऑटोग्राफ देत आहे. फॅन्स या सर्व गोष्टी त्यांच्या हातात फेकत आहे. आणि मग रिजवान त्यावर ऑटोग्राफ देत आहे. या दरम्यान एक चाहता त्याच्याजवळ पाकिस्तान संघाचा झेंडा फेकतो. हा झेंडा खाली पडू न देता तो व्यवस्थित कॅच करतो. आणि त्या टेबलावर ठेवतो. या दरम्यान झेंड्याचा काही हिस्सा हा जमीनीला टेकलेला असतो. 

ज्यावेळेस जर्सीवर ऑटोग्राफ दिल्यानंतर तो झेंडा उचलण्यास जातो, त्यावेळेस खाली असलेला अर्धा झेंड्याचा भाग तो पायाने उचलतो. या त्याच्या कृतीवर पाकिस्तानी फॅन्स (Pakistan fans) भडकले आहेत. जो झेंडा देशाचा मान आणि सन्मान आहे, त्या झेंड्याला पाय लावत नाही, हे या पाकिस्तानी फलंदाजालाही कळत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतो, त्या देशाच्या झेंड्याची लाज देखील राखली नाही अशी संतापजनक टीका आता त्याच्यावर होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Khel Shel (@khelshel)

रिझवानकडून (Mohammad Rizwan) ही चूक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी घडली असेल पण किमान रिजवानने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली पाहिजे,अशी मागणी आता जोर धरतेय. 

दरम्यान पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका (PAK Vs ENG) खेळण्यात व्यस्त आहे. 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले 4 सामने कराचीत खेळले गेले आणि आता संघाचा ताफा लाहोरला पोहोचला आहे. मालिकेतील 5 वा टी-20 सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधीच मोठा वाद उफाळलाय.