VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!

Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 18, 2024, 04:03 PM IST
VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की! title=
Haris Rauf Fight With Pakistan Fan viral video

Haris Rauf Fight With Pakistan Fan Video: टी-20 वर्ल्ड कपमधून (T20 world cup 2024) पाकिस्तानच्या टीमचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बुधवारपासून सुपर- 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यापूर्वीच पाकिस्तानी टीमच्या टीमने घरचा रस्ता पकडला. त्याआधी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफचा एक व्हिडीओ (Haris Rauf viral video) व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रौफ चाहत्यावर चांगलाच संतापलेला दिसतोय. याशिवाय चाहता आणि त्याच्या मित्रांसोबत धक्काबुक्की करताना कॅमेरामध्ये कैद झालं आहे. 

काय घडलं नेमकं प्रकरणं?

पाकिस्तानला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकाही सामन्यात वर्चस्व गाजवता आलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचे फॅन्स नाराज झाले आहेत. पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यानंतर शुकशुकाट पहायला मिळतोय. अशातच सोशल मीडियावर देखील पाकिस्तानी खेळाडूंना टार्गेट केलं जातं. अशातच पाकिस्तानची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथं देखील पाकिस्तान टीमच्या चाहत्यांनी खेळाडूंसमोर नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ याला जाब विचारला तेव्हा हॅरिस रौफचा पारा चढल्याचं दिसून आलं. त्यावेळी हॅरिस रौफ चाहत्याच्या अंगावर धावून देखील गेला.

व्हिडीओमध्ये काय म्हणाला हॅरिस?

हॅरिसचं भांडण होताना हा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट केला आहे. यावेळी हॅरिस संतापाने, तू तर भारतीय असशील असं म्हणतोय. शिवाय याला प्रत्युत्तर म्हणून, तो चाहता देखील मी पाकिस्तानचा आहे. असं उत्तर देतोय. त्यावेळी हॅरिसची पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. तेव्हा हॅरिसने तिचे देखील हात झटकले अन् चाहत्याला मारहाण करायला गेला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.

दरम्यान, पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होताच, बाबर आझमकडून कॅप्टन्सी काढून घ्यावी आणि काही खेळाडूंना नारळ द्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे. त्यावर मला पीसीबीने पुन्हा बोलवलं होतं, हा त्यांचा निर्णय होता. आता आम्ही पुन्हा गेल्यावर यावर नक्की चर्चा करू, असं बाबर आझमने म्हटलं आहे. त्यावेळी आता पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा पीसीबीकडे असेल, असं म्हणत बाबरने पीसीबीच्या हातात निर्णय सोपवला आहे. तर बाबर सोबत हॅरिस रौफ, मोहम्मद आमीर आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना देखील टाटा गुड बाय करावा लागेल, अशी शक्यता आहे.