राजस्थानविरुद्ध पृथ्वी शॉची जबरदस्त खेळी

आयपीएल २०१८च्या सीझनमध्ये ज्या खेळाडूंच्या कामगिरीची आठवण राहील त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी शॉ.

Updated: May 3, 2018, 12:58 PM IST
राजस्थानविरुद्ध पृथ्वी शॉची जबरदस्त खेळी title=

मुंबई : आयपीएल २०१८च्या सीझनमध्ये ज्या खेळाडूंच्या कामगिरीची आठवण राहील त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी शॉ. मुंबईचा हा युवा क्रिकेटर ज्याप्रकारे फलंदाजी करतोय ते पाहता भविष्यात तो मोठी कामगिरी करेल असेच वाटते. याआधी स्थानिक स्तरावर त्याची कामगिरी पाहिल्यानंतर त्याला पुढच्या पिढीचा सचिन तेंडुलकर म्हटले जातेय. तो सध्या आयपीएलमध्ये ज्याप्रकारे खेळतोय ते पाहता क्रिकेटमध्ये नवा तारा येत असल्याचे दिसतेय.

यंदाच्या सीझनमध्ये दिमाखदार कामगिरी

यंदाच्या सीझनमध्ये ४ सामन्यांत आतापर्यंत त्याने १४० धावा केल्यात. बुधवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी खेळी केली. त्याच्या तडाखेबंद खेळीमुळे आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाला राजस्थानविरुद्ध विजय मिळवता आला. पृथ्वी शॉने राजस्थानविरुद्ध ४७ धावांची खेळी केली. सामान्य उंचीचा हा क्रिकेटर एकाहून एक सरस असे शॉट मारत होता. डोळ्यांचे पारणे फेडणारी अशी त्याची खेळी होती. 

चौथ्या वर्षी आईला गमावले...

त्याचा खेळ पाहता पृथ्वी लवकरच भारतीय संघात स्थान मिळवेल यात शंकाच नाहीये. पृथ्वीचे कुटुंब बिहारचे आहे मात्र त्यानंतर त्याचे आई-वडिल मुंबईला शिफ्ट झाले. पृथ्वी ४ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. पृथ्वीचे क्रिकेटचे स्वप्न संपू नये यासाठी त्याचे वडिल पंकज शॉ यांनी व्यवसायही सोडला. पृथ्वीचे वडिल सिंगल पॅरेंट असतानाही त्यांनी त्याला आई आणि वडिलांचे प्रेम दिले. 

IPL 2018 : Rishabh pant gets orange cap with stormy innings

२०११मध्ये पृथ्वी शॉची पॉली उम्रीगर स्पर्धेसाठी अंतिम ११मध्ये निवड झाली. १४व्या वर्षी तो पहिल्यांदा चर्चेत आला. त्याने डिव्हिजन मॅचमध्ये ३३० चेंडूत ५४६ धावा केल्या होत्या. २०१६मध्ये त्याला अंडर-19 संघात स्थान मिळाले. या संघाने युश एशिया चषक आपल्या नावे केला. यानंतर त्याने दोनच महिन्यात रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. सेमीफायनलमध्ये त्याने तामिळनाडूविरुद्ध दुसऱ्या डावात शतक ठोकताना संघाला विजय मिळवून दिला. २०१७मध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने शतक ठोकले. या स्पर्धेत शतक ठोकणारा तो युवा क्रिकेटर ठरला. यात त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले.