भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये येऊ शकतो 'हा' अडथळा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरपासून सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 16, 2017, 02:33 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये येऊ शकतो 'हा' अडथळा title=
File Photo

चेन्नई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरपासून सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर रोजी पहिली वन-डे मॅच खेळली जाणार आहे. चेन्नईमध्ये ही मॅच खेळली जाणार आहे. पण, या मॅचमध्ये पाऊस अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये शनिवारपासून सोमवारपर्यंत पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज आहे. पाऊस झाल्यास प्रेक्षकांना कमी ओव्हर्सची मॅच पहाण्यास मिळू शकते.

चेन्नईतील चेपॉक मैदानात पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील पहिली मॅच खेळवली जाणार आहे. वन-डे सीरिजनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ३ टी-२० मॅचेसची सीरिज खेळणार आहे. मात्र, वन-डे सीरिजमध्ये वरुणराजा अडथळा निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.