राजकोट : बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी न्यूझीलंड सीरिजसाठी टीमची निवड केली. मात्र, या टीममध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याला संधी दिली नाही.
रविंद्र जाडेजाला संधी न दिल्याने तो खचला नाही तर त्याने आपल्या बॅटिंगच्याच सहाय्याने निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
रविंद्र जडेजाने सौराष्ट आणि जम्मू काश्मीर यांच्यात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीत तुफान फटकेबाजी करत डबल सेंच्युरी झळकावली आहे. जम्मू काश्मीर विरोधात रविंद्र जाडेजाने ही पाचवी डबल सेंच्युरी लगावली आहे.
रविंद्र जाडेजाने 23 फोर आणि दोन सिक्सर लगावत 201 रन्स केले. त्यासोबतच शेल्डॉन जॅक्सन (181) आणि स्नेल पटेल (94) रन्स करत सौराष्ट्रच्या टीमला मजबूत स्थितीत नेलं. सौराष्ट्रच्या टीमने 624 रन्सचा डोंगर उभा करत इनिंग घोषित केली.
त्यानंतर जम्मू काश्मीरने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट्स गमावत 103 रन्स केले. जम्मू काश्मीरच्या टीमकडून शुभम खजूरियाने 41 रनेस केले तर कॅप्टन परवेज रसूलने 23 रन्स केले. सौराष्ट्रच्या टीमकडून धरमेंद्रसिंह जडेजाने 36 रन्स देत तीन आणि रविंद्र जडेजाने 20 रन्स देत एक विकेट घेतला.
न्यूझीलंडविरोधात बीसीसीआयच्या निवड समितीने रविंद्र जडेजा आणि स्पिनर रविंचंद्रन अश्विन यांना आराम देण्याचं सांगत टीममधून बाहेर बसवलं. या दोन्ही प्लेअर्सला टीम मॅनेजमेंट यापूढेही संधी देणार नसल्याची चर्चा होत आहे.