आशिया चषक हॉकी: भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या हॉकी मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा ३-१ असा दणदणीत पराभव केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 15, 2017, 07:03 PM IST
आशिया चषक हॉकी: भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव title=

ढाका : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या हॉकी मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा ३-१ असा दणदणीत पराभव केला आहे.

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय टीमने सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव ठेवला होता. भारताने पहिला गोल करत दबाव वाढवला. त्यानंतर लगेचच दुसरा गोल करण्यात भारतीय टीमला यश आलं. त्यामुळे पाकिस्तानची टीम चांगलीच दबावात आल्याचं पहायला मिळालं.

पण, त्यानंतर पाकिस्तानच्या टीमने भारतावर गोल केला. भारताच्या आक्रमक खेळास उत्तर देणे पाकिस्तानला शक्‍य झालं नाही आणि अखेर भारताने ही मॅच ३-१ने जिंकली. 

पहिल्या सत्रात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सला एकही गोल करता आला नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताने गोल करत पाकिस्तानवर दबावा वाढवला. त्यानंतर भारतीय टीमने आणखीन दोन गोल करत पाकिस्तानच्या टीमला अडचणीत आणलं.

मग, पाकिस्तानच्या टीमने एक गोल करत मॅचमध्ये पूनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. या टूर्नामेंटमध्ये भारतीय टीम पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहे. तर पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे.