India vs South Africa: : ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेशी (South africa) लढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया (Team india) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असणार आहेत. टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 (Playing 11) कशी असेल.
टीम इंडियाचा गोलंदाज युढवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चांगलाच फ्लॉप ठरतोय. आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत तो त्याची छाप पाडू शकला नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळू शकते.
युझवेंद्र चहलचा ऑस्ट्रेलिया मालिकेत सलग 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. या मालिकेत युझवेंद्र चहलने 3 सामन्यात 9.12 च्या इकॉनॉमीने रन्स केले आणि त्याला फक्त 2 विकेट घेता आल्या. ही खराब कामगिरी पाहता रोहित शर्मा आर अश्विनला संधी देऊ शकतो. आर अश्विन 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे.
आर अश्विनने टीम इंडियासाठी 56 टी-20 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून टेस्ट सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांमध्ये आर अश्विनला टीममध्ये संधी दिली तर तो टीमसाठी मोठा फायदा ठरू शकतो.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल आणि रविचंद्रन अश्विन.