रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Updated: Feb 25, 2022, 09:42 AM IST
रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस title=

मुंबई : विराट कोहलीच्या नंतर टीम इंडियाच्या सर्व फॉर्मेटच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. जेव्हापासून रोहित कर्णधार झालाय तेव्हापासून तो टीममध्ये विविध प्रयोग करतोय. आणि मुख्य म्हणजे तो करत असलेले सर्व प्रयोग यशस्वी होतायत. दरम्यान कर्णधार होऊन काही दिवसचं झाले असताना त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. यामध्ये त्याने माजी कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर भारताला सलग दहावा विजय मिळवून दिला आहे. रोहित कर्णधार असताना न्यूझीलंडविरूद्ध 3 टी-20 सामने जिंकले. त्यानंतर वेस्टइंडिज विरूद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामने जिंकून क्लिन स्विप दिला. त्यानंतर आता श्रीलंकेलाही पहिल्या सामन्यात मात दिली. अशा पद्धतीने रोहितने कर्णधार म्हणून सलग 10 सामने जिंकून घेतलं.

श्रीलंकेविरूद्ध सामना जिंकून रोहितने घरच्या मैदानावर सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. त्याने आता पर्यंत भारतात 15 टी-20 सामने जिंकले आहेत. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनशी बरोबरी केली आहे. मुख्य म्हणजे त्याने केवळ 16 सामन्यांमध्ये का कारनामा केला आहे. 

रोहितने घरच्या मैदानावर सर्वात जास्त टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकलंय. विराटने यामध्ये 13 टी-20 सामने जिंकले आहेत. तर धोनीने 10 सामने जिंकले आहेत.