Rohit sharma Winning trophy : टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरूद्धची वनडे सीरिज 3-0 अशी जिंकली. यासोबतच आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI ranking) टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. वनडे सीरिजनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सीरिज देखील जिंकायची आहे. दरम्यान वनडे सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडूंनी ट्रॉफीसोबत एकच आनंद साजरा केला. मात्र यावेळी चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आला तो म्हणजे, रोहितने (Rohit sharma) जिंकल्यानंतर ट्रॉफी कोणाच्या हाती दिली?
न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने किवींचा सुपडा साफ केला. पहिल्या सामन्यात 12 रन्सने, दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने तर तिसऱ्या सामन्यात थेट 90 रन्सने भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. सीरिजमध्ये तिसऱ्या वनडेच्या विजयानंतर खेळाडू फार खुशीत दिसून आले.
Another comprehensive performance from #TeamIndia as they outclass New Zealand by 90 runs in Indore to complete a 3-0 whitewash.
Scorecard https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/7IQZ3J2xfI
— BCCI (@BCCI) January 24, 2023
वनडे सीरिजच्या विजयाची ट्रॉफी हाती येताच रोहितच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यानंतर संपूर्ण टीमजवळ येऊन रोहितने केएस भरतकडे विजयाची ट्रॉफी सोपवली. याशिवाय रोहित शर्माने त्याचं मोठं मन पुन्हा एकदा दाखवत टीमच्या सपोर्ट स्टाफमधील सर्वात वरिष्ठ व्यक्तीच्या हातात ही ट्रॉफी दिली. दरम्यान याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. लोकांना कर्णधार रोहित शर्माची ही कृती फारच आवडली आहे.
Captain @ImRo45 collects the trophy as #TeamIndia clinch the #INDvNZ ODI series
Scorecard https://t.co/ojTz5RqWZf…@mastercardindia pic.twitter.com/5D5lO6AryG
— BCCI (@BCCI) January 24, 2023
आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सीरिजमध्ये 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.