देशभरात साजरा झाला धुळवडीचा सण. रंगात रंगून प्रत्येकाने या सणाचा आनंद लुटला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच रंगामध्ये रंगून केले होते. अशावेळी भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा चर्चेतील खेळाडू रोहित शर्मा देखील हा रंगाचा उत्सव खेळण्यापासून मागे नव्हता. रोहितने आपला होळी खेळण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 37 वर्षांचा रोहित अगदी 10 ते 15 वर्षांचा मुलगा धुलिवंदन खेळतो तसाच अगदी रंगांनी खेळत होता. याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत होळी खेळली. रोहितसोबत त्याचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील काही खेळाडू देखील या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रोहित रंगपंचमीच्या या उत्साहात अतिशय बेभान होऊन नाचत होता एवढंच नव्हे तर रंगांची उधळणही करत होता. रोहितने व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामनला पाण्याने आंघोळही केली. मुंबई इंडियन्सने त्याचा व्हिडिओ स्वतंत्रपणे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे.
या फोटोंमध्ये रोहित शर्मा मुलगी समायरासोबत धुलिवंदन हा सण अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने खेळताना दिसत आहे. रोहितने होळी सेलिब्रेशनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो समायरासोबत दिसत आहे. रोहितच्या हातात पिचकारी देखील दिसत आहे. दुसऱ्या चित्रात तो एका व्यक्तीवर गुलाल उधळत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'थोडा रंग, थोडी मजा.'
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला होता. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने IPL 2024 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला. रोहित शर्माने 2013 च्या मोसमानंतर प्रथमच कर्णधार म्हणून आयपीएलला सुरुवात केली नव्हती. पण या सामन्यात त्याच्या बॅटची जादू मात्र चालली. असं असतानाही संघाला पराभव स्विकारावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई एके काळी विजयाच्या जवळ जाताना दिसत होती. पण अखेर गुजरातने हा सामना 6 धावांनी जिंकला. आता मुंबईचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(20 ov) 210/6
|
VS |
GT
204/8(20 ov)
|
| Rajasthan Royals beat Gujarat Titans by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.