Rohit Sharma पर्याय शोधतोय?? टीम इंडियातून डच्चू मिळाला तर 'या' टीमसोबत खेळणार!

 जानेवारी 2023 मध्ये टीम इंडियाला एशियन चॅम्पियन टीम श्रीलंकेसोबत 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये रोहित खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय.

Updated: Dec 26, 2022, 04:34 PM IST
Rohit Sharma पर्याय शोधतोय?? टीम इंडियातून डच्चू मिळाला तर 'या' टीमसोबत खेळणार! title=

Rohit Sharma : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशाच्या दौऱ्यावर दुखापतग्रस्त (Injured Rohit Sharma) झाला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, ज्यानंतर तो 2 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधून (Test Series) बाहेर पडला होता. जानेवारी 2023 मध्ये टीम इंडियाला एशियन चॅम्पियन टीम श्रीलंकेसोबत 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये रोहित खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. तर दुसरीकडे रोहितने रणजी टीमसोबत नेट प्रॅक्टिस सुरु केली.

मुंबईच्या टीमसोबत केली प्रॅक्टिस

टीम इंडियाचा ओपनर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान त्याच्या फॉर्ममुळे त्याला टीकांचा देखील सामना करावा लागतोय. 35 वर्षीय रोहित श्रीलंकेविरूद्ध खेळणार की नाही, याबाबत अजून अधिकृतरित्या अपडेट देण्यात आलेलं नाही.

बीसीसीआय लवकरच श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या सिरीजसाठी 15 सदस्यांच्या टीमची घोषणा करणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीये, रोहितने रणजी मुंबई (Mumbai Ranji Team) सोबत प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने पहिल्यांदा नेट्समध्ये एकट्याने 15 मिनिटं प्रॅक्टिस केली. यानंतर रोहित शर्मा सोमवारी मुंबईच्या रणजी टीमसोबत प्रॅक्टिस केली. इतकंच नाही तर तो मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्येही पोहोचला होता. 

रोहित शर्माकडून टी-20 चं कर्णधारपद काढलं जाऊ शकतं

टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदावरून रोहित शर्माची गच्छंती होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. श्रीलंका सिरीज संदर्भात एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya)कडे टीमचं नेतृत्व सोपवल्यात आल्याचं दिसतंय. 

श्रीलंकेविरूद्ध वनडे आणि टी-20 सिरीज

टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीजचा पहिला सामना 3 जानेवारी रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजचं कसं असणार आहे, ते पाहूयात

  • तारीख                 सामना                जागा
  • 3 जानेवरी            पहिली टी20          मुंबई
  • 5 जानेवरी           दूसरी टी20             पुणे
  • 7 जानेवरी          तीसरी टी20           राजकोट
  • 10 जानेवरी        पहिली वनडे           गुवाहाटी
  • 12 जानेवरी        दूसरी वनडे           कोलकाता
  • 15 जानेवरी        तीसरी वनडे         तिरुवनंतपुरम