जेव्हा सायना प्रभासला भेटते...

बाहुबली चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रभासने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर राज्य केले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 7, 2017, 03:31 PM IST
जेव्हा सायना प्रभासला भेटते...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : बाहुबली चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रभासने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर राज्य केले. त्याचा भारदस्त लूक आणि पिळदार शरीरयष्टी यामुळे अनेक तरुणी त्याच्या प्रेमात आहेत. त्याची एक झलक बघण्यासाठी अनेकजणी उत्सुक असतात. या तरुणींमध्ये एक खास तरुणी देखील सामील आहे. ती म्हणजे भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल. तिने प्रभासच्या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

हैदराबादमध्ये सायनाने प्रभासची भेट घेतली. ''बाहुबली' प्रभाससोबत…' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

A post shared by Saina Nehwal (@nehwalsaina) on

हैदराबादमध्ये प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंग करत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत झळकणार आहे.   २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.