Shahid Afridi: पाकिस्तानचं भविष्य अफ्रिदीच्या हातात... नवी जबाबदारी खांद्यावर, मोठी घोषणा झाली!

Shahid Afridi, Chief Selector PCB: आगामी न्यूझीलंड (PAK vs NZ) दौऱ्यावर आपलं हसू होऊ नये, म्हणून पाकिस्तान नवी रणनिती आखली आहे.

Updated: Dec 24, 2022, 06:08 PM IST
Shahid Afridi: पाकिस्तानचं भविष्य अफ्रिदीच्या हातात... नवी जबाबदारी खांद्यावर, मोठी घोषणा झाली! title=
Shahid Afridi, Chief Selector PCB

Pakistan Cricket: तब्बल 22 वर्ष आपल्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तानला नव्या उंचीवर पोहोचवणाऱ्या शहिन अफ्रिदीच्या (Shahid Afridi) खांद्यावर नवी जबाबदारी (interim Chief Selector) देण्यात आली आहे. इंग्लंडने पाकिस्तानला (Pakistan Cricket Team)  कसोटी मालिकेत लोळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. त्यानंतर आता आगामी न्यूझीलंड (PAK vs NZ) दौऱ्यावर आपलं हसू होऊ नये, म्हणून पाकिस्तान नवी रणनिती आखली आहे. ()

शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आलंय. अफ्रिदीचे एकेकाळचे सहकारी अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) आणि राव इफ्तिखार अंजुम (Rao Iftikhar Anjum) हे देखील तीन सदस्यीय निवड समितीचा भाग असणार आहेत.

आणखी वाचा - Ind vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर

नजम सेठी (Nazam Sethi) यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं (Chairperson of the PCB) अध्यक्षपद देण्यात आलं होतं. त्यानंतर काहीच दिवसात पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये (Pakistan Cricket Board) मोठे बदल दिसू लागले आहेत. शाहिद अफ्रिदी नेहमी पाकिस्तान क्रिकेटर्सला सल्ले देताना दिसतो. त्यामुळे त्याला अधिकृतरित्या संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्याची ही नियुक्ती केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand tour of Pakistan) आगामी मालिकेसाठी असणार आहे. त्यामुळे आता अफ्रिदीच्या कोणत्या खेळाडूंना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ही जबाबदारी माझ्या क्षमतेनुसार पार पाडण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही, असं शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला आहे