विराट-रोहितच्या पुढे गेला शोएब मलिक

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं विराट कोहली आणि रोहित शर्माचं रेकॉर्ड मोडलं आहे. 

Updated: Jul 1, 2018, 07:34 PM IST
विराट-रोहितच्या पुढे गेला शोएब मलिक

हरारे : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं विराट कोहली आणि रोहित शर्माचं रेकॉर्ड मोडलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेमध्ये २ हजार रनचा टप्पा ओलांडणारा मलिक हा तिसरा आणि आशिया खंडातला पहिला खेळाडू बनला आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२०मध्ये २ हजार रन पूर्ण करण्यासाठी विराटला १७ आणि रोहितला ५१ रनची आवश्यकता होती. तर त्याचवेळी शोएब मलिकनं ९८ मॅचमध्ये १९८९ रन केले होते. पण आयर्लंडविरुद्धच्या टी-२०मध्ये विराट ९ रनवर तर रोहित शून्य रनवर आऊट झाला.

पाकिस्तानची सध्या झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाबरोबर टी-२० ट्राय सीरिज सुरु आहे. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये मलिकनं झिम्बाब्वेविरुद्ध २४ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. यामुळे मलिकच्या टी-२० क्रिकेटमध्ये आता २०२६ रन आहेत. मलिकनं ९२ इनिंगमध्ये ३२ ची सरासरी आणि १२२ च्या स्ट्राईक रेटनं २ हजार रन केल्या.

विराट सर्वात जलद २ हजार करणार

शोएब मलिकनं हे रेकॉर्ड केलं असलं तरी सर्वात जलद २ हजार रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे. विराट कोहली आत्तापर्यंत फक्त ५५ आंतरराष्ट्रीय टी-२० इनिंग खेळला आहे. २ हजार रन करणाऱ्या इतर बॅट्समनपेक्षा या कमीच इनिंग आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये ३ जुलैपासून ३ टी-२० मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. या सीरिजमध्ये विराट आणि रोहित हे शोएब मलिकच्या पुढे जाऊ शकतात.

टी-२० मध्ये सर्वाधिक रन करणारे खेळाडू

मार्टिन गुप्टील(न्यूझीलंड)- २२७१ रन- ७९ इनिंग

ब्रॅण्डन मॅक्कलम(न्यूझीलंड)- २१४० रन- ७० इनिंग

शोएब मलिक(पाकिस्तान)- २०२६ रन- ९२ इनिंग

विराट कोहली (भारत)- १९९२ रन- ५५ इनिंग

रोहित शर्मा (भारत)- १९४९ रन- ७४ इनिंग

मोहम्मद शहजाद (अफगाणिस्तान)- १९०६ रन- ६३ इनिंग

तिलकरत्ने दिलशान(श्रीलंका)- १८८९ रन- ७९ इनिंग

जेपी ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका)- १८२२ रन- ७० इनिंग

डेव्हिड वॉर्नर(ऑस्ट्रेलिया)- १७९२ रन- ७० इनिंग

इओन मॉर्गन (इंग्लंड)- १६९३ रन- ७१ इनिंग