CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा!

Shubman Gill Net Worth: शुबमनचं नशिब चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं.  

Updated: May 30, 2023, 09:06 PM IST
CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा! title=
Shubman Gill Net Worth

Shubman Gill Net Worth: शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरगं. लहानपणी कोणा एकाने बॅट हातात दिली अन् पोरानं नशीब काढलं. यंदाच्या आयपीएल हंगामात फक्त दोन नाव चर्चेत होती. एक म्हणजे चेन्नई थाला महेंद्रसिंह धोनी आणि दुसरा गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार शुभमन गिल (Shubman Gill). 17 सामन्यात 890 धावा करून शुभमनने मैदान मारलं. त्याचबरोबर त्याने यंदाच्या आयपीएल हंगामात ऑरेंज कॅप देखील पटकावली आहे. यामध्ये 3 धुंवाधार शतकं (shubman gill century) तर 4 शानदार फिफ्टीचा देखील समावेश आहे. शुभमनची बॅटिंग तशी तगडी. मात्र, त्याची कमाई देखील त्याच्या बॅटिंग प्रमाणेच आहे. जाणून घेऊया शुभमन गिलची संपत्ती (Shubman Gill Net Worth) आहे तरी किती?

2018 च्या सिझनमध्ये शुभमन गिलने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. कोलकाता नाईट रायडर्सने 1.80 कोटीच्या रकमेत त्याला संघात सामील करण्यात आलं होतं. मात्र, शुबमनचं लक चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं. शुभमन गिलने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. परिणामी, बीसीसीआयने त्याला करारामध्येही बढती दिली होती आणि आता गिल ग्रेड-बीचा भाग आहे आणि बीसीसीआयचं सॅलरी बोर्ड त्याला वार्षिक 3 कोटी रुपये देतं.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराजचा खाच चेला म्हणजे शुभमन गिल. दोन्ही पंजाबी खेळाडूंमध्ये चांगली मैत्री आहे, त्याचबरोबर गुरू शिष्याचं नातं. युवराजप्रमाणे शुभमनला गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे 89 लाख रुपयांची रेंज रोव्हर कार आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे एक एसयूव्ही कार देखील आहे. ज्याची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2021 च्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल गिलला महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी महिंद्रा थार भेट दिली.

आणखी वाचा -IPL 2023: शुभमन गिलचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू!

दरम्यान, माध्यम रिपोर्टनुसार, शुभमन गिलची संपत्ती ही 4 मिलियन डॉलर किंवा 31 कोटी रुपये इतकी आहे. प्रत्येक महिन्याला तो 66 लाख रुपये कमावतो. याशिवाय, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो चांगली कमाई करतो. Gillette, Engage, CEAT, Nike, Fiama या कंपन्यांच्या अॅडमधून त्याला भरघोस रक्कम देखील मिळते. त्याचबरोबर शंतनु निखिल क्रिकेट क्लबचा तो ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.