विराट कोहली नाही तर 'हा' ठरला सर्वाधिक पगार घेणारा क्रिकेटर

जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या फोर्ब्जच्या यादीत भलेही विराट कोहलीने स्थान मिळवलं असेल. मात्र, असे असले तरी सॅलरीच्या बाबतीत विराट कोहलीला एका क्रिकेटरने मागे टाकले आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 19, 2017, 08:09 PM IST
विराट कोहली नाही तर 'हा' ठरला सर्वाधिक पगार घेणारा क्रिकेटर title=
File Photo

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या फोर्ब्जच्या यादीत भलेही विराट कोहलीने स्थान मिळवलं असेल. मात्र, असे असले तरी सॅलरीच्या बाबतीत विराट कोहलीला एका क्रिकेटरने मागे टाकले आहे.

फोर्ब्जने जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-१०० खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या यादीत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली या एकमेव भारतीय क्रिकेटरला स्थान मिळालं होतं.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या या यादीत विराट कोहली ८९ व्या क्रमांकावर होता. विराट कोहलीची कमाई दोन कोटी २० लाख डॉलर आहे. ज्यापैकी ३० लाख डॉलर सॅलरी आणि पूरस्कार तर, १ कोटी ९० लाख डॉलर हे जाहीरातींच्या माध्यमातून मिळतात. पण, असे असले तरी विराट कोहलीला एका क्रिकेटरने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीची सॅलरी ही ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टिव्ह स्मिथ याच्यापेक्षा कमी आहे. विराट कोहली हा स्मिथच नाही तर इंग्लंडच्या जो रूट याच्याही मागे आहे.

वेगवेगळ्या देशातील क्रिकेट बोर्डतर्फे देण्यात येणाऱ्या सॅलरीसंदर्भात ईएसपीएन क्रिक इन्फोने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत क्रिकेटर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली कमाई मोजण्यात आली आहे. यामध्ये टी-२० लीग तसेच इतर लोकल टुर्नामेंट जोडण्यात आलेल्या नाहीयेत.

स्मिथ ठरला अव्वल

सर्वाधिक सॅलरी घेणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन स्मिथ हा अव्वल ठरला आहे. स्मिथला १.४७ मिलियन डॉलर प्रत्येक वर्षाला मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रूट हा आहे. रुटची सॅलरी १.३८ मिलियन डॉलर वार्षिक आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे. विराट कोहलीला वर्षाला १ मिलियन डॉलर सॅलरी मिळते.