आता सनी उतरणार फुटबॉलच्या मैदानात...

अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी विविध स्पर्धा आणि लीगच्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये आपले पैसे गुंतवले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 12, 2017, 10:25 AM IST
आता सनी उतरणार फुटबॉलच्या मैदानात...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी विविध स्पर्धा आणि लीगच्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये आपले पैसे गुंतवले. अशातच बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी ही ‘प्रीमियर फुटबॉल लीग’ मध्ये दिसून येणार आहे. केरळ कोब्राज संघाची सहमालक झाल्याची माहिती समोर आली आहे. सहमालक असण्याबरोबरच ती या संघाची ब्रँड अॅम्बेसिडर देखील आहे. 

‘प्रीमियर फुटबॉल लीग’चा दुसरा सिझन १५ सप्टेंबरपासून मुंबईत सुरु होत आहे. याचे काही सामने १७ सप्टेंबरपर्यंत वरळी येथील एनएससीआई येथे होणार आहेत. त्यापुढील १९ ते २४ सप्टेंबरपर्यंतचे सामने बंगळुरच्या कोरमंगला इंडोर स्टेडियममध्ये खेळले जातील. ‘प्रीमियर फुटबॉल लीग’च्या माहितीनुसार उपांत्य आणि अंतिम फेरी दुबईमध्ये २६ सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत आहे. 

यासंदर्भात सनी म्हणाली की, ‘फुटबॉल हा केरळमधील लोकप्रिय खेळ आहे यात काही शंकाच नाही. प्रीमियर फुटबॉल लीगचा मी एक भाग असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली या खेळाची लोकप्रियता लक्षात घेऊन मी केरळ कोब्राज संघात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.’