वादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!

न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!

Updated: Oct 29, 2022, 07:01 PM IST
वादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू! title=

T 20 World Cup 2022 NZ vs Sl : टी-20 वर्ल्ड कपमधील न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील सामन्यामध्ये (T-20 World Cup NZvsSL 2022) किवींनी लंकेच्या संघाचा पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाच्या 168 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 102 धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचं वादळी शतक आणि ट्रेंड बोल्टच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या संघाने शरणागती पत्करली. मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या शतकवीर ग्लेन फिलिप्सने त्याचा नावावर मोठा विक्रम केला आहे. 
 
न्यूझीलंडच्या संघाची अवस्था 15 वर 3 असताना संकटमोचक होत ग्लेन फिलिप्सने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं. 64 चेंडूमध्ये ग्लेनने 104 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले. फिलिप्सने या खेळीसोबत टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधित शतके मारणाऱ्या यादीत नंबर मिळवला आहे.

फिलिप्सने दोन शतके केली असून त्यासोबतच त्याने वर्ल्डकपमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या नंबरवर येत शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतके कॉलिन मुन्रोच्या नावावर असून त्याची 3 शतके आहेत. ब्रेंडन मॅक्युलम आणि मार्टिन गुप्टिल यांनी दोन शतके केली आहेत.

दरम्यान, श्रीलंकेने सुरूवातील धक्के देत मॅचवर पकड मिळवली होता. फिलिप्सला एक जीवदान मिळालं त्यानंतर गड्यानं शतकी खेळी करत धावसंख्या 150 च्या वर नेली. मात्र त्यानंतर ट्रेंड बोल्डने केलेल्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या सुरूवातीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बोल्टने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावा देत 4 गडी बाद केले.