दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे. टी-२० सीरिज ५-०च्या अंतराने जिंकणारी भारतीय टीम जगातली पहिली टीम बनली आहे. तसंच न्यूझीलंडमध्येही भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकली आहे. या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा फायदा भारतीय खेळाडूंना आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्येही झाला आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये केएल राहुल टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. केएल राहुलची क्रमवारीतली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये राहुलला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं. राहुलने या सीरिजमध्ये २४४ रन केले होते. याआधी केएल राहुल चौथ्या क्रमांकावर होता. राहुलशिवाय रोहित शर्मा ३ क्रम वरती १०व्या क्रमांकावर, श्रेयस अय्यर ६३ स्थानं वरती ५५व्या क्रमांकावर आणि मनिष पांडे १२ स्थानं वरती ५८व्या क्रमांकावर आला आहे.
पाकिस्तानचा बाबर आजम ८७९ रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. केएल राहुलकडे ८२३ रेटिंग पॉईंट्स आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. भारताचे ३ बॅट्समन हे टॉप-१०मध्ये आहेत.
बॉलरच्या यादीत जसप्रीत बुमराहला २६ क्रमांचा फायदा झाला आहे. बुमराह आथा ११व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर युझवेंद्र चहलने १० स्थानांची उडी मारल्यामुळे तो ३०व्या क्रमांकावर आला आहे. सीरिजमध्ये ८ विकेट घेणारा शार्दुल ठाकूर ३४ क्रम वरती ५७व्या क्रमांकावर आला आहे. अफगाणिस्तानचा स्पिनर राशीद खान आणि त्याचा सहकारी मुजीब उर रहमान दुसऱ्या क्रमांकावर आहेत. टॉप-१०मध्ये भारताचा एकही बॉलर नाही.
देशांच्या क्रमवारीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. तर पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडची टीम सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश
कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....