मुंबई : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेचं आयोजन यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (OMAN) करण्यात आलंय. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) या पारंपरिक प्रतिस्पर्धकांचा सामना हा या वर्ल्ड कपमधील आकर्षणाची बाब आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. क्रिकेट चाहते हा हायव्होलटेज सामना स्टेडियममध्ये जावून पाहण्यासाठी हवे तितकी रक्कम मोजायला तयार आहेत. (T20 World Cup 2021 netizens demanded ban to india vs pakistan match on twitter)
एकाबाजूला क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्सुकता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सुरूवातीला वादाचं ग्रहण लागलंय. टी-20 वर्ल्डकपच्या सुरूवातीलाच भारत-पाकचा मुद्दा चर्चेत आलाय. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होत आहे. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार द्यावा, असं नेटीझन्सची मागणी आहे. सोशल मीडियात भारत-पाक मॅचवर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झालाय.
#ban_pak_cricket हा हॅशटॅग जोरदार ट्रेडिंग होतोय. नेटीझन्स हा हॅश्टॅग वापरुन ट्विट करत आहेत. तसेच विविध मीमसच्या माध्यामातून या सामन्याला विरोध केला जातोय. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होत आहे. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार द्यावा, असं नेटीझन्सची मागणी आहे. अनेक नेटीझन्स हे #ban_pak_cricket हा हॅश्टॅग वापरुन आपली भूमिका मांडत आहेत.
का केला जातोय विरोध?
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात भारताच्या 9 जवानांना वीरमरण आलं. यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाचं वातावरण आहे. शहिदांच्या कुंटुंबियांकडून या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे. तर सोशल मीडियावर या दोन्ही संघामध्ये होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
As soon as possible, the terrorist country Pakistan and all the characters involved in it should be banned, the whole world has now come to know who makes terrorists. There is no point in tolerating them.#ban_pak_cricket #SanctionPakistan pic.twitter.com/xov98Ozavg
— Ankur Moni Deka (@AnkurMoniDeka4) October 17, 2021
Army fight at borders
But it is our duty to fight in other waysLet us boycott PakistanCricket so that we can cause financial loss to Pakistan.
Let us tag Star Sports that if it telecasts pak cricket - then we shall unsubscribe the channel.@StarSportsIndia
— uk (@kaptainuday) October 17, 2021