T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 मधील दुसरा सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने उपांत्य फेरी जवळपास निश्चित केलीय. पण रविवारी सकाळी झालेल्या अफगानिस्ता विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहिला मिळाला. सुपर 8 च्या फेरीत अफगाणिस्तानने कांगांरुची शिकार केलीय. 21 धावांनी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय.
T-20 वर्ल्ड कपमधील गट 2 मधील 2 उपांत्य फेरीतील संघ निश्चित व्हायचं आहेत. हे दोन संघ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भिडणार असून भारताने 2 सामने जिंकले आहेत. पण तरीही भारतीय संघाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे गरजेचे आहे.
अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत टीम इंडिया सुपर-8 च्या ग्रुप-1 पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यानुसार संघाचे 4 गुण असून धावगती देखील 2.425 आहे. ऑस्ट्रेलिया 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया हरवत दोन गुण मिळवले आहेत तर ते तिसऱ्या स्थानावर आहेत.. तर बांगलादेश दोन सामने हारले आहेत.
Semi Final चं गणित समजून घेताना पाइंट टेबलमधील स्थितीवर एक नजर टाकूयात
पहिली स्थिती - अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया हरवल्यामुळे या स्थितीत अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियाचे 2-2 गुण झाले आहे. आता या दोन्ही संघांचा 1-1 सामना बाकी आहे. हे जिंकून दोन्ही संघ भारताच्या बरोबरीने 4-4 गुणांवर पोहोचतील. या स्थितीत, चांगला रनरेट असलेल्या दोनच संघांना उपांत्य फेरीचं तिकीट दिलं जाणार आहे.
दुसरी स्थिती - अफगाणिस्तानच्या विजयानंतर, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामना हरली तरच भारताची स्थिती बिकट असेल. असे झाल्यास 3 संघ 4-4 गुणांवर पोहोचतील आणि प्रकरण केवळ रनरेटवर येऊन अडकेल.
या दोन स्थिती टाळण्यासाठी भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धुळ चारावी लागेल. तर हे करण्यात टीम इंडिया यश आलं तर गट-1 मध्ये पहिलं राहून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात भारताचं तिकीट पक्क होईल.
IND
(23.5 ov) 90/2 (113 ov) 471
|
VS |
ENG
465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.