'हे बंगळुरुचं पिच नाही,' पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला 'विराट' टोला; म्हणाला, 'इथे फलंदाजांना..'

Brutal Take On Virat Kohli In T20 World Cup 2024: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आयपीएलप्रमाणे दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 29, 2024, 01:30 PM IST
'हे बंगळुरुचं पिच नाही,' पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला 'विराट' टोला; म्हणाला, 'इथे फलंदाजांना..' title=
विराट सेमी-फायनलमध्ये 9 धावांवर बाद झाला

Brutal Take On Virat Kohli In T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून मैदानात उतरत असलेला विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत आहे. भारताने खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये विराटला केवळ 75 धावा करता आल्या आहेत. बांगलादेशविरुद्धचा सामना वगळता विराटला मोठी आणि प्रभावशाली खेळी करता आलेली नाही. विशेष म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की विराट कोहली शून्यावर बाद झाला. एकदा नाही तर दोनदा विराट बाद झाला. विराटला सेमी-फायनलच्या सामन्यातही इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करता आली नाही. एक उत्तम खयटाक लगावल्यानंतर विराट बाद झाला. विराटला 9 बॉलमध्ये 9 धावाच करता आल्या. गुआनामधील मैदानावर विराट अपयशी ठरला. तो रेसी टोप्लेच्या उत्तम टप्प्यावरील बॉलवर फटका मारण्यास गेला. मात्र बॉलचा त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि तो क्लिन बोल्ड झाला. 

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा खोचक टोला

विराटच्या या विकेटसंदर्भात भारताच्या फलंदाजीनंतर सामन्यातील दोन इनिंग्जदरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने विराटची फिरकी घेतली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिथे खेळवली जात आहे तेथील खेळपट्टी ही बंगळुरुच्या खेळपट्टीप्रमाणे नसल्याची आठवण लतीफने विराटला करुन दिली. बंगळुरुमधील चेन्नास्वामीतील खेळपट्टी काही वेगळी आहे असं नाही. मात्र है मैदान म्हणजे विराट कोहली इंडियन प्रिमिअर लीगमधून ज्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाकडून खेळतो त्यांचं होम ग्राऊण्ड आहे. 

नक्की >> T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...

नेमकं काय म्हणाला हा पाकिस्तानचा माजी कर्णधार

"विराटला त्याच्या नियोजित प्लॅनप्रमाणे खेळता आलं नाही. ही काही बंगळुरुची खेळपट्टी नाही. ही खेळपट्टी वेगळी आहे. या खेळपट्टीवर चेंडू टोलवणे सोप्पं नाही. संपूर्ण संघाला मिळून धावसंख्या 171 पर्यंत नेता आली. ही साधी खेळपट्टी नाही. इथे फलंदाजांना खेळताना अडचणींचा सामना करावा लागतो," असं लतिफने 'कॉट बिहाईंड' या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं. एकाप्रकारे लतिफने विराटला परिस्थितीची जाणीव करुन देताना अप्रत्यक्षपणे त्याची खिल्लीच उडवली.

नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'

...मात्र रोहितने केली पाठराखण

मात्र भारताने सेमी-फायनलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला 68 धावांनी पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. विराटचा सध्याचा फॉर्म हा माझ्यासाठी चिंतेचा विषय नसल्याचं रोहितने स्पष्टपणे सांगितलं.

नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती

"तो (विराट) एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू या असल्या फेजमधून जातो. आम्हाला त्याचा दर्जा काय आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे याची कल्पना आहे. त्याचा फॉर्म हा आमच्यासाठी कधीच चिंतेचा विषय नसतो. त्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. तो नक्कीच (फायनलमध्ये) खेळेल याच शंका नाही," असं रोहितने भारतीय संघ फायनलला पोहचल्यानंतर म्हटलं.तसेच विराट कोहली हा मोठ्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करतो असं म्हणताना तो फायनलमध्ये नक्कीच चांगला खेळेल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.