T20 वर्ल्ड कपसाठी 'या' चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?

ईशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन की ऋषभ पंत कोणाची व्हावी टीम इंडियात निवड

Updated: Sep 9, 2022, 02:07 PM IST
T20 वर्ल्ड कपसाठी 'या' चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला? title=

Team India Squad for T20 World Cup : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर 4 मधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 101 धावांनी धूळ चारत मोठ विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टी20 क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवला. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी एशिया कप स्पर्धेतला प्रवास त्यांचा प्रवास संपला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभव स्विकारावा लागल्याने भारताला गाशा गुंडाळावा लागला.

एशिया कपमधल्या टीम इंडियाच्या कामगिरीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषत: भारतीय गोलंदाजी या स्पर्धेत खूपच कमकुवत जाणवली. फलंदाजीच्या क्रमवारीही गोंधळलेली होती. पहिल्या सामन्यापासूनच प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहिला मिळाले. विशेषत: विकेटकिपर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी कोणाची निवड करायची याबाबत संघात मतभिन्नता होती. 

आता आव्हान टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं
एशिया कप स्पर्धेनंतर आता भारतीय संघासमोर आव्हान आहे ते टी-20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup). 16 सप्टेंबरपर्यंत भारतीय टीमची (Team India) घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघासमोर प्रमुख प्रश्न आहे तो विकेटकीपर म्हणून संघात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा. अशात भारतीय संघासमोर चार पर्याय आहेत. यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

दिनेश कार्तिक
चार विकेटकिपरपैकी पहिला पर्याय आहे अनुभवी दिनेश कार्तिक (DINESH KARTHIK). टीम इंडियासाठी दिनेश कार्तिक पहिली पसंती असू शकते. दिनेश कार्तिक अनुभवी तर आहेच शिवाय त्याच्याकडे बेस्ट फिनिशर म्हणूनही पाहिलं जातं. गेल्या काही स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने दिनेश कार्तिकने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. IPL 2022 नंतर दिनेश कार्तिकने बेस्ट फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.

संजू सैमसन
संजू सॅमसन (sanju samson) भारतीय संघात नेहमीच उपेक्षित खेळाडू राहिला आहे. चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात त्याला म्हणावी तशी संधी जेण्यात आलेली नाही. 2015 मध्ये संजूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणकेलं. त्यानंतर गेल्या 7 वर्षात तो टीम इंडियासाटी केवळ 16 टी-20 सामने खेळला आहे. ज्यात त्याने 296 धावा केल्या आहेत. पण यावेळी संजू सॅमसनला टी20 स्काडमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईशान किशन
युवा आणि तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ईशान किशनही (ISHAN KISHAN) या स्पर्धेत आहे. पण त्याला टी20 सारख्या मोठ्या स्पर्धेत कितपत संधी मिळेल याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी ईशान किशन ओळखला जातो. भारतीय संघात त्याने सलामीला येऊन आपली छाप उमटवली आहे. 

ऋषभ पंत
भारतीय संघाचा सध्याचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant). पण एशिया कप 2022 स्पर्धेत त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याला त्याच्या निवडीबाबत क्रिकेट चाहत्यांमध्येच नाराजी आहे. ऋषभ पंतने यंदाच्या वर्षात 15 टी20 सामन्यात 290 धावा केल्या आहेत.