Ind Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?

India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.

Updated: Mar 19, 2023, 07:11 PM IST
Ind Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय? title=

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात विशाखापट्टणममध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाचा (Team India) धुव्वा उडवत 10 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता तिसरी वनडे खूप महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 ओव्हर्समध्ये सामना संपवला. दरम्यान या पराभवामुळे टीम इंडियाच्या नावे एका नकोश्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया अवघ्या 117 रन्सवर ऑलआऊट झाली. यामुळे भारताने नकोसा विक्रम नावे करून घेतला आहे. टीम इंडियाचा हा घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात कमी स्कोर आहे. वनडेमध्ये भारताचा हा तिसरा सर्वात कमी स्कोर असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

फलंदाजांची खराब कामगिरी

आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.

कांगारूंचे ओपनर्स मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड या दोघांनीही वनडे नव्हे तर टी-20 सारखी फलंदाजी केली. टीम इंडियाने दिलेल्या 118 रन्सच्या टारगेटला दोन्ही फलंदाजांनी अवघ्या 66 बॉल्समध्ये पूर्ण केलं. हेडने 30 बॉल्समध्ये 51 तर मिचेल मार्शने 36 बॉल्समध्ये 66 रन्सची तुफान खेळी केली आणि पाहता पाहता संपूर्ण सामना अवघ्या 11 ओव्हर्स म्हणजेच 66 बॉल्समध्ये संपून गेला.

चेंडूंच्या बाबतीत वनडेमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा पराभव

  • 234 बॉल्स विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 2023
  • 212 बॉल्स विरूद्ध न्यूझीलंड, 2019
  • 209 बॉल बनाम श्रीलंका, 2010

भारताच्याच भूमीवर सर्वात कमी स्कोर (भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया)

  • भारत- 117, विशाखापट्टणम 2023
  • ऑस्ट्रेलिया- 141, अहमदाबाद, 1986
  • भारत- 148, वडोदरा 2007

सर्वात कमी स्कोर (भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया)

  • भारत- 63, सिडनी 1981
  • भारत- 100, सिडनी 2000
  • ऑस्ट्रेलिया- 101, पर्थ 1991
  • भारत- 117, विशाखापट्टणम 2023