WPL 2023: झोपडपट्टीमधील महिलांना स्टेडिअममध्ये बसून सामना पाहण्याची संधी; अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्न स्टेडियमवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला फार उत्सुक दिसत होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचं महत्व अधिक वाढलंय. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस टीमची खरेदी केली.

Updated: Mar 19, 2023, 09:08 PM IST
WPL 2023: झोपडपट्टीमधील महिलांना स्टेडिअममध्ये बसून सामना पाहण्याची संधी; अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम title=

WPL 2023: पुरुष खेळाडूंच्या आयपीएलप्रमाणे आता महिला प्रिमियर लीग (WPL 2023) देखील सुरु झालीये. दरम्यान यावेळी या सामन्याचा आनंद घेण्याची संधी शहरी झोपडपट्ट्यांमधील महिलांना मिळाली. अदानी उद्योग समूहाची शाखा असलेल्या अदानी फौंडेशनच्या वतीने शनिवारी हा अभिनव कल्पना राबवण्यात आली. या निमित्ताने झोपडपट्ट्यांमधील 50 महिलांना ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगीबेरंगी वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. 

गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्न स्टेडियमवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला फार उत्सुक दिसत होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचं महत्व अधिक वाढलंय. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस टीमची खरेदी केली.

टीमच्या सल्लागार मिताली राज यांनी फ्रॅंचायजीच्या या उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळी मिताली राज म्हणाली, खेळ सुरु असताना डगआऊटमधून महिलांचा आवाज ऐकू येत होता. आम्ही पाहिलं तेव्हा आमच्या स्टॅंडमध्ये काही अत्यंत प्रतिभावान महिला उपस्थित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमटलं होतं.

महिलांची उपस्थिती पाहून टीममधील प्रत्येक जण हरखून गेला. झोपडपट्ट्यांमधील महिलांना या खेळासाठी आमंत्रित करण्याची कल्पना खरंच खूप उत्तम आणि हृदयस्पर्शी होती. ही संध्याकाळ आमच्या कायम आठवणीत राहणार आहे, असंही मितालीने सांगितलं.

अदानी स्पोर्टसलाईन ही अदानी समूहाची एक वैविध्यपूर्ण क्रीडा शाखा आहे. ही शाखा बंदरे, उर्जा, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक पॉवर निर्मिती, ट्रान्समिशन, खाणकाम, विमानतळ ऑपरेशन, नैसर्गिक वायू आणि अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते. 2019 मध्ये  या शाखेची स्थापना झाली. 

तळागाळामध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचं आणि भारतातून भविष्यातील विजेते निर्माण करण्याचं व्यापक तत्वज्ञान अदानी स्पोर्टसलाईनकडे आहे. समूहाच्या राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाची इकोसिस्टिम तयार करण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळेच ही कंपनी क्रीडा प्रतिभेचे पालनपोषण करताना क्रीडा अर्थव्यवस्थेला गती देते.