Rohit Sharma| 'हिटमॅन' रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास की फेल?

टीम इंडियाच्या (Rohit Sharma) वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.   

Updated: Jan 26, 2022, 06:53 PM IST
Rohit Sharma| 'हिटमॅन' रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास की फेल? title=

मुंबई : टीम इंडियाच्या (Rohit Sharma) वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  दुखापतग्रस्त असलेल्या रोहितने फिटनेस टेस्ट (Rohit Sharma Fitness Test) दिली आणि त्यात तो पास झाला आहे. रोहित कर्णधार म्हणून टीममध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे निवड समितीसमोर विंडिज विरुद्धच्या (West Indies Tour India 2022) वनडे आणि टी 20 मालिकेसाठी रोहितचा पर्याय असणार आहे. (team india captain hitman rohit sharma pass in fitness test before to selection committe meeting for west indies t 20 and odi series)
 
विंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात विंडिज टीम इंडियाविरुद्ध वनडे आणि टी 20 अशा दोन्ही 3 सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची 27 जानेवारीपर्यंत निवड होणं अपेक्षित आहे. 

रोहितला दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी दुखापत झाली होती. रोहितला सरावादरम्यान हाताला थ्रो डाऊन  स्पेशालिस्ट डी राघवेंद्रने  (Throwdown Specialis D Raghavendra) थ्रो केलेला चेंडू लागला होता. 

मात्र त्यानंतर रोहितला  हॅमस्ट्रिंग (left hamstring injury) इंज्युरी असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे रोहितला आफ्रिका विरुद्धच्या वनडेनंतर कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं. 

विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

पहिली वनडे - 6 फेब्रुवारी 
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी

वरील तिन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.  

पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी 
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी 

टी 20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातातील इडन गार्डनमध्ये पार पडतील.