एका झटक्यात खेळ बदलवणारा खेळाडू, रोहितच्या नेतृत्वात संधीच मिळेना

रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम काही मोठे बदल केले. पण एक असा खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा संधी देत ​​नाहीये.  

Updated: Mar 11, 2022, 09:28 PM IST
एका झटक्यात खेळ बदलवणारा खेळाडू, रोहितच्या नेतृत्वात संधीच मिळेना title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. रोहितने टीम काही मोठे बदल केले. पण एक असा खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा संधी देत ​​नाहीये. हा खेळाडू त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर काही ओव्हर्समध्ये सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता या बॉलरमध्ये आहे. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच (Ind vs SL 2nd Test) कर्णधार रोहित शर्माने या खेळाडूला वगळलं आहे. (team india captain rohit sharma not give chance to  kuldeep yadav after virat kohli)
 
रोहितने श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत कुलदीप यादवला संधी दिली नाही. रोहितने कुलदीपला वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतही  संधी दिली नाही. आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला वगळण्यात आले आहे. यामुळे कुलदीपच्या कारकिर्दीवर पॉवर ब्रेक लागताना दिसतोय.

कुलदीपच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. रोहितने कुलदीपला पहिल्या कसोटीही संधी दिली नव्हती. यामुळे कुलदीपवर एकही सामना न खेळता बाहेर बसण्याची वेळ ओढावली आहे.

महेंद्रसिंह धोनी कॅप्टन असताना कुलदीपची कारकिर्द बहरली होती. धोनी आणि कुलदीप बॅट्समनची ठरवून शिकार करायचे. मात्र त्यानंतर विराट कॅप्टन झाला. विराटने कुलदीपकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे रोहित कॅप्टन झाल्यावर तरी कुलदीपला संधी देईल, असं क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं. मात्र विराटप्रमाणे रोहितनेही कुलदीपकडे दुर्लक्ष केलं. यामुळे आता कुलदीप या सर्व प्रकाराला वैतागून निवृत्तीच घेईल, असं क्रिकेट चाहते म्हणतायेत.  

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.