केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ. 

Updated: Jan 9, 2018, 08:43 AM IST
केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ. 

केपटाऊनमध्ये टीम इंडियाला पराभवाचे दु:ख असले तरी यावर फुंकर घालण्यासाठी दुबईतून आनंदाची खबर आलीये. सोमवारी आयीसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या अॅशेज सीरिजमध्ये ४-० असा विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या रँकिंगमध्ये तिसरे स्थान मिळवलेय. इंग्लंडचा मालिकेत पराभव झाल्याने ते या क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचलेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडची घसरण

अॅशेस सीरिजच्या सुरुवातीला कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या स्थानावर होता. सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांनी तिसरे स्थान गाठलेय. या रँकिंगमध्ये १०५ स्थानास तिसऱ्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर घसरलाय. या रँकिंगमध्ये भारतीय संघ १२४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 

ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा २० अंकानी मागे

पहिल्या स्थानावर विराजमान असलेला भारतीय संघाहून ऑस्ट्रेलिया २० अंकांनी मागे आहे. भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका २८ जानेवारीला जोहान्सबर्गमध्ये संपणार आहे. यानंतर कसोटी रँकिंगमध्ये बदल होऊ शकतात.