India Vs England 2nd Test: इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. या सामन्यानंतर टीम इंडियाला दोन मोठे धक्के देखील लागले. यामध्ये केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमधून बाहेर गेले आहेत. अशातच आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
इंग्लंडविरूद्धची सिरीज सुरु होण्यापूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांमधून आपलं नाव मागे घेतलं होतं. यानंतर आता अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे सिरीजमधून बाहेर पडलाय. पण आता सिरीजमधील दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.
'या' 4 खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार टीम इंडिया
आता टीम इंडियाला दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली, शमी, जडेजा आणि राहुलशिवाय खेळावं लागणार आहे. या 4 दिग्गज खेळाडूंशिवाय भारतीय संघाला दुसऱ्या टेस्टमध्ये कमबॅक करणं फार कठीण जाईल, असं मानलं जातंय. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहितसह इतर खेळाडूंवर अनेक जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
'या' कारणामुळे खेळाडू बाहेर
विराट कोहली - वैयक्तिक कारणांमुळे माघार
रवींद्र जडेजा - पायाच्या स्नायूंना दुखापत
केएल राहुल - उजव्या मांडीत वेदना
मोहम्मद शमी - घोट्याला दुखापत
दुसऱ्या टेस्टमध्ये या खेळाडूंना मिळणार संधी
आता दुसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा आणि केएल राहुलच्या जागी रजत पाटीदार आणि सर्फराज खान यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकतं. इतकंच नाही गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन गिलचा देखील फ्लॉप शो सुरु आहे. त्यामुळे त्याला देखील वगळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी इंडियाचा स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.