T-20 World cup मध्ये भारतासाठी हा खेळाडू ठरु शकतो चांगला फिनिशर

कोण निभावणार टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका...

Updated: Oct 22, 2021, 07:32 PM IST
T-20 World cup मध्ये भारतासाठी हा खेळाडू ठरु शकतो चांगला फिनिशर title=

मुंबई : यूएई आणि ओमानच्या भूमीवर टी20 विश्वचषक 2021 ची सुरुवात झाली आहे. सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत आणि दोन्ही देशांचे प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. पण सामन्यापूर्वी अनेक जण आपले मत नोंदवत आहेत. यामुळे वातावरण शिगेला पोहोचले आहे. 

टी-20 क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महान फलंदाज रॉबिन उथप्पा याने सांगितले की, सध्याच्या विश्वचषकात भारतासाठी कोण फिनिशरची भूमिका बजावेल.

टीम इंडियाचा सध्याचा फिनिशर कोण आहे?

टी-20 विश्वचषक 2007 च्या विजेत्या संघाचा सदस्य रॉबिन उथप्पा म्हणाला की, 'रवींद्र जडेजा हा भारतीय संघात असलेला सर्वोत्तम फिरकीपटू आहे. त्याने आपला खेळ मोठ्या उंचीवर नेला आहे. ज्याप्रकारे त्याने आपला खेळ विकसित केला ते कौतुकास्पद आहे, त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे. जडेजा भारतासाठी सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून सिद्ध होऊ शकतो. रॉबिन उथप्पा आणि रवींद्र जडेजा दोघेही आयपीएलमध्ये CSK कडून खेळतात.
 
रवींद्र जडेजा हा संघासाठी त्या त्रिशूळासारखा आहे. जो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वत्र फिट बसतो. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे त्याने महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले, टी-20 विश्वचषक 2021 मध्ये विराट कोहली त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करेल. दुबईच्या फिरकी खेळपट्टीवर संघाच्या विजयात जडेजा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जडेजाची चपळता मैदानावर दिसते. रवींद्र जडेजाने आपल्या कामगिरीने सीएसकेला अंतिम फेरीत नेण्यासाठी उपयुक्त योगदान दिले आहे. जडेजाने 16 सामन्यांत 13 विकेट घेतल्या आणि आयपीएल 2021 मध्ये CSK साठी 227 उपयुक्त धावा केल्या.