नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असताना पहायला मिळतात. आता अशाच प्रकारे नवा रेकॉर्ड इंग्लंडच्या टीममधील ओपनर बॅट्समन जॉनी बेयरस्टाने केला आहे.
जॉनी बेयरस्टा याने धडाकेबाज बॅटिंग करत तुफानी सेंच्युरी लगावली आहे. यासोबतच त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडच्या टीमने पाचव्या आणि शेवटच्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा सात विकेट्सने पराभव करत ३-२ ने सीरिज जिंकली. २२४ रन्सचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमकडून बेयरस्टाने ६० बॉल्समध्ये १०४ रन्सची इनिंग खेळली. यावेळी त्याला साथ दिली अॅलेक्स हेल्स याने.
अॅलेक्स हेल्सने ६१ रन्सची इनिंग खेळली. अशा प्रकारे बेयरस्टा आणि अॅलेक्स यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५५ रन्सची पार्टनरशिप केली. इंग्लंडच्या टीमने ३२.४ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावत २२९ रन्स केले आणि विजय मिळवला.
या मॅचमध्ये बेयरस्टाने ६० बॉल्समध्ये १०४ रन्सची तुफानी इनिंग खेळली. त्याने केवळ ५८ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. ही सेंच्युरी म्हणजे इंग्लंडच्या टीमकडून खेळण्यात आलीली तिसरी वेगवान सेंच्युरी ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडच्या बटलरने ४६ बॉल्समध्ये आणि मोइन अलीने ५३ बॉल्समध्ये सेंच्युरी केली होती.
What a catch from #Bairstow https://t.co/Z363XsiSFo
— Kyran Pick (@kyranpick) March 10, 2018
बेयरस्टाने टीम साऊथीची बाऊंड्रीवर एक शानदार कॅचही घेतली. विक्सच्या बॉलिंगवर साऊथीने बॉल उचलून मारला मात्र, बेयरस्टाने शानदार कॅच पकडत त्याला आऊट केलं.